Headlines

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत ‘मेक ईन कोकण’ उद्योग महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

⚡सावंतवाडी ता.१९-:
मेक ईन कोकण’ उपक्रमांतर्गत “उद्योग, व्यवसाय, रोजगार महोत्सव २०२५” या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन सावंतवाडीत मोठ्या उत्साहात पार पडले. भारतीय जनता पक्षाचे युवा नेते मा. श्री. विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

‘पद्मश्री’ मा. परशुराम गंगावणे यांच्या शुभहस्ते फीत कापून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी पदाधिकारी, स्थानिक उद्योजक, बचतगट सदस्य तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या महोत्सवाचा उद्देश प्रधानमंत्री मा. नरेंद्रजी मोदी यांच्या “आत्मनिर्भर भारत” या संकल्पनेला बळकटी देत बेरोजगारांना व्यवसायिक दिशा देणे, तसेच स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा आहे. बचतगटांच्या उत्पादनांपासून ते कोकणातील विविध उद्योगांच्या निर्मिती वस्तूंपर्यंत सर्व क्षेत्रातील उत्पादकांना या प्रदर्शनातून नव्या संधी खुल्या झाल्या आहेत.भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी आपल्या वाढदिवसाचा सामाजिक उपक्रमात रूपांतर करून कोकणाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला.

“मेक ईन कोकण” या अभियानाद्वारे स्थानिक उत्पादकांना व्यासपीठ देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.उद्घाटन कार्यक्रमाला सावंतवाडी मंडल अध्यक्ष श्री. सुधीर आडीवरेकर, महिला मंडळ अध्यक्षा सौ. मोहिनी मडगावकर, नगरसेविका सौ. दीपाली भालेकर, युवा मोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, सरचिटणीस दिलीप भालेकर, सोशल मिडिया प्रमुख केतन आजगावकर, चिटणीस धीरेंद्र म्हापसेकर, शक्ती केंद्र प्रमुख अमित गवंडळकर, बूथ अध्यक्ष विजू साटेलकर, रंगनाथ गवस, शिरीष नाईक, सुकन्या टोपले, नयना सावंत, मेघना साळगावकर, अनुषा मेस्त्री, ज्योती मुद्राले तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.या भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवामुळे सावंतवाडी व परिसरातील स्थानिक उद्योजकांना नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page