Headlines

नेरुर येथे नरकासुर आणि बैल सजावट स्पर्धा…

उद्योजक रूपेश पावसकर यांची पत्रकार परिषदेत माहिती. कुडाळ : रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक रुपेश पावस्कर पुरस्कृत नेरुर पंचक्रोशी मर्यादित कलेचा देव कलेवर भव्य नरकासूर स्पर्धा २०२५ रविवार दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी, तर बुधवार दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी भव्य बैल सजावट स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे पहिलेच वर्ष…

Read Full News

पत्रकार यशवंत माधव यांना मातृशोक…

⚡बांदा ता.१८-:मडूरा – रेडकरवाडी येथील श्रीमती काशीबाई कृष्णा माधव (७५) यांचे अल्पशा आजाराने मुंबईत उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, विवाहित मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी सैनिक चंद्रकांत माधव आणि कोकण व्हिजन न्यूज चॅनेलचे संपादक यशवंत माधव यांच्या त्या आई होत.

Read Full News

भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग”च्या स्थापनेने कलाकारांमध्ये उत्साहाची लाट…

⚡सावंतवाडी ता.१८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी परंपरेचा गौरव जपण्यासाठी आणि कलाकारांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी “भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग” ही संस्था नुकतीच अधिकृतरीत्या नोंदणीकृत झाली आहे. या ऐतिहासिक घटनेमुळे जिल्ह्यातील सर्व भजनी कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थेचे मुख्य उद्दिष्टे अत्यंत व्यापक असून त्यात भजनी कलाकारांना शासनस्तरावर अनुदान उपलब्ध करून देणे, “स्वातंत्र्य भजन सदन” उभारणे, शासकीय…

Read Full News

वेंगुर्ल्यात भव्य खुली व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न…

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन.. ⚡वेंगुर्ला ता.१७-: भारतीय जनता पार्टीचे युवा नेते श्री. विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला येथे भव्य खुली व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग आणि जय मानसीश्वर मित्र मंडळ वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रसन्न (बाळू) देसाई प्रमुख…

Read Full News

एलईडी लाईट शोद्वारे सिंधुदुर्ग किल्ला झळाळून निघणार…

तारकर्लीत पर्यटन उद्यान होणार:बाबा मोंडकर यांची माहिती.. ⚡मालवण ता.१७-:सिंधुदुर्ग किल्ला येथे एलईडी लाईट शो तसेच परिसर सुशोभीकरण करण्यात येणार असून किल्ल्याच्या सौंदर्यात अधिक भर पडणार आहे. एलईडी लाईट शो माध्यमातून रात्रीच्या वेळी किल्ला उजळून निघणार आहे. तसेच तारकर्ली येथे पर्यटन उद्यान निर्मिती होणार आहे. या दोन्ही कामांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पालकमंत्री नितेश राणे यांनी १०…

Read Full News

कुडाळात कोंबड्यांच्या झुंजीवर सट्टा…

९ जणांवर गुन्हा:व्हाट्सएपवरची जाहिरात अंगलट.. ⚡कुडाळ ता.१७-: कोंबड्यांच्या झुंजी आयोजित करून त्यावर सट्टा जुगाराचा खेळ खेळला जाणार असल्याची व्हाट्सअपवर जाहिरात केल्याप्रकरणी ९ जणांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुडाळ येथे कोंबड्यांच्या झुंजी आयोजित करून त्यावर सट्टा खेळला जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. याबाबत पोलिसांनी खात्री केली असता, जियाद…

Read Full News

दोडामार्ग येथील मांस वाहतूक करणाऱ्या कार जळीत प्रकरणी तिघांना जामीन…

⚡कणकवली ता.१९-:दोडामार्ग पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या वीजघर चेकपोस्ट येथे पोलीस कर्मचारी परशुराम सावंत हे बकरा सदृश्य असलेले मांस वाहतूक करणारी स्विफ्ट कार घेऊन पोलीस स्टेशन येथे जात होते. यावेळी सदर गाडी अडवून ५० ते ६० लोकांच्या जमावाने गाडी फोडत आतील मांस रस्त्यावर फेकले. यावेळी स्विप्ट चालक निजामुद्दीन कुरेशी व पोलीस कर्मचारी श्री. सावंत याला मारहाण…

Read Full News

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी संगणकाची मदत होईल…

विजय घरत:नांदगाव प्राथमिक शाळेला प्रिमियर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे संगणक प्रदान.. ⚡कणकवली ता.१७-:विद्यार्थ्यांना लहान वयात संगणकाची हाताळणी केल्यास पुढील जीवनात त्यांना फायदा होईल. या शाळेच्या शिक्षकांनी आपल्याकडे संगणक संचाची मागणी केली. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रिमियर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे संगणक संच देण्यात आला. यापुढे प्राथमिक आरोग्य केंद्र ला औषध पुरवठा व सामाजिक उपक्रम राबवले…

Read Full News

सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्यावर कारवाई कराचर्मकार समाज उन्नती मंडळाची मागणी : प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन…

कणकवली : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सुनावनीदरम्यान मनुवादी व सनातनी विचारसरणीचा अ‍ॅड. राकेश किशोर यांनी बूट फेकून मारून हल्ला केला. या भ्याड हल्ल्याचा सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या कणकवली शाखेतर्फे निषेध करीत आहे. हल्लेखोरावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मंडळाने केली आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी जगदिश कातकर यांच्याकडे मंडळाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी दिले.निवेदनात म्हटले…

Read Full News

जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी केली बालगृहातील बालकांसमवेत दिपावली साजरी…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१७-: जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांनी आज बालगृहातील बालकांसोबत दिवाळी साजरी केली.बालगृहातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या समवेत कुटुंबाप्रमाणे दिवाळी सण साजरा करताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बालगृहातील बालकांना बाहेरच्या जगाचा अनुभव घेवून आयुष्य चांगल्या पध्दतीने व यशस्वी रित्या जगण्याची प्रेरणा देवुन बालकांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.तसेच पोलीस अधिक्षक…

Read Full News

You cannot copy content of this page