वेंगुर्ल्यात भव्य खुली व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न…

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन..

⚡वेंगुर्ला ता.१७-: भारतीय जनता पार्टीचे युवा नेते श्री. विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला येथे भव्य खुली व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग आणि जय मानसीश्वर मित्र मंडळ वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रसन्न (बाळू) देसाई प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. येस. एल. बिडिकर, भाजपा महिला तालुका अध्यक्षा सौ. सुजाता पडवळ, तालुका सरचिटणीस श्री. वसंत तांडेल, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री. हेमंत गावडे, तालुका उपाध्यक्ष श्री. प्रितम सावंत, श्री. सचिन शेटये, श्री. भूषण सारंग, श्री. नामदेव सरमळकर, श्री. प्रमोद गोळम, राष्ट्रीय पंच श्री. अनिल जगदाळे आणि श्री. मोहन मालवणकर यांनी कार्यक्रमाला शोभा दिली.कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्रा. सचिन परूळकर यांनी केले. या स्पर्धेमुळे वेंगुर्ल्यातील तरुण खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून खेळाडूवृत्ती, शिस्त आणि संघभावनेचा उत्कृष्ट संगम अनुभवायला मिळाला.युवा नेते श्री. विशाल प्रभाकर परब यांच्या प्रेरणेतून आयोजित झालेल्या या उपक्रमाने वेंगुर्ला तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात नवा उत्साह निर्माण केला आहे.

You cannot copy content of this page