बांदा केंद्रशाळेत विद्यार्थ्यांनी साकारली दिवाळीची झगमग…

आकाशकंदील व सजावटी साहित्य प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद..

⚡बांदा ता.१८-: पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा क्र. १ येथे दीपावली सणाचे औचित्य साधून कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकाशकंदील, पणत्या, उटणे आणि विविध सजावटीच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. याला पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमाला पालक व ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनाचे उद्घाटन व्यवस्थापन समितीचे सदस्य हेमंत मोर्ये यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने आणि कलागुणांनी सजलेल्या या प्रदर्शनाचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक शांताराम असनकर आणि सर्व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंमधून आत्मनिर्भरतेचा आणि कौशल्य विकासाचा संदेश देण्यात आला. या उपक्रमामुळे मुलांमध्ये सर्जनशीलतेचा विकास होऊन ‘शिकत शिकत उपजीविका’ या संकल्पनेला बळ मिळाल्याचे मत पालक वर्गातून व्यक्त करण्यात आले.
फोटो:-
बांदा केंद्रशाळेत आयोजित आकाशकंदील व दिवाळी साहित्य विक्रीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

You cannot copy content of this page