Headlines

मळगाव येथील अष्टविनायक कला क्रिडा मंडळाच्यावतीने आयोजित दुर्ग बांधणी स्पर्धेत अर्जुन गावकर प्रथम…

⚡सावंतवाडी ता.०८-: मळगाव रस्तावाडी येथील अष्टविनायक कला क्रिडा मंडळाच्यावतीने दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या दुर्ग बांधणी स्पर्धेत मळगाव देऊळवाडी येथील अर्जुन विजय गावकर याने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेत एकूण १३ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मळगाव रस्तावाडी येथील अष्ट विनायक कला क्रीडा मंडळाच्यावतीने स्वच्छता मोहीम, एसएससी व स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी सत्कार, शालेय मुलांना…

Read Full News

दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण सह अकराही जणांना जामीन मंजूर…

⚡ओरोस ता ७-: दोडामार्ग तिलारी येथे गोमांस वाहतुकीच्या संशयावरून झालेली मारहाण व कार जाळपोळ प्रकरणी दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण सह उर्वरित अकराही जणांना येथील जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही एस देशमुख यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे.दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन सुभाष चव्हाण, भाजपा मंडळ प्रमुख दीपक उर्फ रामा दशरथ गवस आणि प्रदीप…

Read Full News

अंगावर माड पडून युवकाचा मृत्यू…

⚡कणकवली ता.०७-: माड तोडत असताना तो मधोमध तुटून अंगावर पडल्याने कल्पेश दत्तात्रय नाडकर्णी (वय ३५, रा. तोंडवली या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना तोंडवली येथेच गुरुवारी सायंकाळी ६.३० वा. सुमारास घडली. कल्पेश हा आपले चुलते पद्माकर नाडकर्णी यांच्यासमवेत एका शेजाऱ्याचा सुकलेला माड कटर मशीन व दोरीच्या सहाय्याने तोडत होते. माड तोडत असतानाच अचानक मधोमध…

Read Full News

गोवेरीच्या सत्पुरुष आणि भराडीदेवीचा उद्या जत्रोत्सव…

कुडाळ : गोवेरीचे ग्रामदैवत श्री देव सत्पुरुष व श्री देवी भराडीचा वार्षिक जत्रोत्सव 8 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी दहा वाजल्यापासून ओटी भरणे, नवस बोलणे – फेडणे, रात्री 10 वाजता श्रींचा पालखी सोहळा, त्यानंतर नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे, उपस्थित रहण्याचे आवाहन श्री देव सत्पुरुष देवी भराडी देवस्थान कमिटीच्यावतीने करण्यात…

Read Full News

वाफोली येथे कृषी मेळाव्यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

बांदा/प्रतिनिधीशेतकऱ्यांच्या शेतीविषयक अडचणी सोडवून त्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांच्या ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वाफोली येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. हा मेळावा सहयोगी अधिष्ठाता डॉ. वि. वि. दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साही वातावरणात पार पडला.मेळाव्यात तांत्रिक अधिकारी, क्षेत्रीय…

Read Full News

रवळनाथ मंदिर परिसरात हायमास्ट दिव्याचे लोकार्पण…

⚡सावंतवाडी ता.०७-: श्री देव रवळनाथ मंदिराकडील हायमामास्टचे उद्घाटन हर्षद गावडे यांच्या हस्ते गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आले. आपल्या गावात हायमास्ट मिळावा यासाठी भाजप प्रणित श्री देव रवळनाथ मित्र मंडळाने मिळून पाठपुरावा करत, जिल्हा नियोजनमधून हायमास्ट मंजूर करून घेतला.शेवटी प्रत्यक्ष स्वरूपात त्याची उभारणी होऊन त्याचे उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले.

Read Full News

मालवणचे सुपुत्र आसिम सादिक मेमन सि. ए परीक्षेत कोल्हापूर विभागामधून प्रथम..!

⚡मालवण ता.०७-:दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट ऑफ इंडियाने चार्टर्ड अकाउंटंटस् (सीए) च्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला असून कोल्हापूर विभागामधून मालवणचे सुपुत्र आसिम सादिक मेमन याने प्रथम क्रमांक पटकविला आसीम सादीक मेमन हे मालवणच्या टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी असून मालवणच्या भारत जनरल स्टोअर्सचे मालक व ज्येष्ठ व्यापारी सादीक दादापे मेमन यांचे चिरंजीव तर मसूद दादापे…

Read Full News

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये वंदे मातरम गीताचा १५० वा वर्धापन दिन साजरा…

⚡कुडाळ ता.०७-: वंदे मातरम या गीताला प्रकाशित होऊन १५० वर्षे पूर्ण झाली, या पार्श्वभूमीवर वंदे मातरम गीताचा १५०वा वर्धापन दिन 7 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा होतो आहे. या पार्श्वभूमीवर बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये वंदे मातरम या गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.यावेळी प्राध्यापक अरुण मर्गज यानी वंदे मातरम गीताचा १५० वा वर्धापन दिन का आपण…

Read Full News

*पालकमंत्री नितेश राणेंचा शनिवार ८ रोजी नागरी सत्कार…

पालकमंत्री नितेश राणे यांनी वाडी वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याच्या निर्णयामुळे समाधान:संविधानिक हितकारिणी महासंघ सिंधुदुर्ग करणार सत्कार.. ⚡कणकवली ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह््यातील १९२ वाडीवस्त्यांची व २५ रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून घेण्यात आला. या निर्णयामुळे जातीवाचक वाडीवस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलेला देशातील पहिला जिल्हा सिंधुदुर्ग ठरला आहे. या निर्णयाची दिल्लीपर्यंत दखल…

Read Full News

सावंतवाडी जिल्हा कारागृहाच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामास ४ कोटींची शासन मान्यता…

सावंतवाडी : जिल्हा कारागृहाच्या मुख्य संरक्षण भिंतीच्या बांधकामाच्या सुमारे ४ कोटी ५ लक्ष ८० हजार २१६ रुपये एवढया रकमेच्या कामास राज्य शासनाच्या गृह विभागाकडून प्रशासकीय मंजूरी प्राप्त झाली आहे‌. माजी मंत्री , आमदार दीपक केसरकर यांच्या सुचनेनुसार कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांनी तसा परीपुर्ण प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसह दिला होता. त्यास मंजूरी मिळाली आहे,…

Read Full News

You cannot copy content of this page