Headlines

एमआयडीसी असोसिएशन करणार ८ ला उद्योग मंत्र्यांचा सत्कार…

एमआयडीसी साठी मंत्री उदय सामंत यांनी दिले ४० कोटी.. कुडाळ : कुडाळ एमआयडीसीच्या विकासात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे गेल्या तीन वर्षांत मोठे सहकार्य मिळाले आहे. रस्ते, पाणी व वीज अशा मुलभूत सुविधांसाठी त्यांनी ४० कोटी रूपये उपलब्ध करून दिले आहेत. मात्र याचा कोणताही गाजावाजा त्यांनी केलेला नाही. असोसिएशनच्या वतीने करण्यात येणा-या सर्व मागण्या…

Read Full News

आचरा येथे कै. गंगाराम गवाणकर यांना विविध संस्थांनी वाहिली श्रद्धांजली…

⚡मालवण ता.०६-:आचरा येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर येथे आयोजित शोकसभेत आचरा येथील श्री रामेश्वर वाचन मंदिर, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आचरा, वैभवशाली पतसंस्था आचरा, यशराज संघटना आचरा, कथामाला मालवण शाखा, कोमसाप मालवण शाखा या संस्थांतर्फे वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आचरा वाचनालय संस्थेचे अध्यक्ष बाबाजी मिसळे यांनी कै. गवाणकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार…

Read Full News

आंबोली येथील मंगळसूत्र चोरीचा अवघ्या १२ तासांत छडा…

हुपरी-इचलकरंजी येथून तिघांना अटक:न्यायालयाने दिली पाच दिवसांची पोलीस कोठडी.. ⚡सावंतवाडी ता.०६-: पाणी मागण्याच्या बहाण्याने आंबोली नांगरतास येथे 60 वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पलायन केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या कालावधीत जलद तपास करून हुपरी इचलकरंजी येथून तिघांना जेरबंद केले. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

Read Full News

भाजपच्या मोहिनी मडगावकर नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक…

.⚡सावंतवाडी, ता. ०६-:भाजपच्या महिला शहराध्यक्ष सौ. मोहिनी मडगावकर या आगामी सावंतवाडी नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून इच्छुक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्य, संघटन बांधणी आणि महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निष्ठेने व प्रामाणिकपणे काम केले आहे. पक्षातील विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या असून, त्यांचे कार्य स्थानिक स्तरावर प्रशंसनीय मानले जाते.“पक्षाच्या…

Read Full News

माजी मंत्री प्रवीण भोंसले यांनी घेतले श्री देवी माऊलीचे दर्शन…

सावंतवाडी : माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार प्रवीण भोंसले यांनी आज सह कुटुंब आपले पुतणे कुणालसिंह व सौ. माधवीदेवी यांनी श्री माऊली देवीची प्रतिवार्षिक ओटी भरून दर्शन घेतले. कोकणच्या झालेल्या भात पिकाच्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना सरकारने द्यावी व सर्व जनतेला सुखी ठेवावे, अशी प्रार्थना देवी माऊली चरणी केली. देवीचे मुख्य गांवकर श्री. राजू व इतर…

Read Full News

संदीप पांढरे यांचा ठाकरे शिवसेनेला रामराम…

​सावंतवाडी,ता.०६: ठाकरे शिवसेनेतील गळती काही थांबायला तयार नाही. माजी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा आणि विधानसभाप्रमुख विक्रांत सावंत यांच्यापाठोपाठ आता उपतालुकाप्रमुख संदीप पांढरे यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे.​पांढरे यांनी आपल्या उपतालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यामुळे सावंतवाडी तालुक्यात ‘ठाकरे’ शिवसेनेच्या संघटनेत मोठे खिंडार पडले आहे. या राजीनाम्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा असली तरी, पांढरे यांनी अद्याप…

Read Full News

कालावल खाडीतील अनधिकृत वाळू उत्खननामुळे पूल धोक्यात…

संबंधितांवर कारवाई व्हावी:अनिल मसुरकर यांची मागणी.. ⚡मालवण ता.०६-:कालावल खाडीत यांत्रिक मशीनद्वारे वाळू उत्खनन न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही ते आदेश पायदळी तुडवून थेट पोकलेन मशीन उतरवून परवानगी नसतानाही मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन सुरू आहे. त्यामुळे कालावल पूल धोक्यात आला आहे. वाळू माफियांना शोधून त्यांच्यावर मकोका कायद्यांतर्गत कठोरात कठोर कारवाई करावी आणि अनधिकृत वाळू उत्खननासाठी…

Read Full News

मालवण-तारकर्ली रस्त्याच्या दुर्दशेमुळे ग्रामस्थ संतप्त…

भाजप पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी वेधले बांधकामचे लक्ष.. ⚡मालवण,ता.०६-:अतिवृष्टीमुळे मालवण-तारकर्ली भागातील रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने आणि भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यासाठी खोदलेला रस्ता दुरुस्त न केल्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने भाजप पदाधिकाऱ्यांसह स्थानिक ग्रामस्थांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. नोव्हेंबर अखेरपर्यंत रस्त्याची दुरुस्ती…

Read Full News

पिंगुळी ग्रा.प.च्या रॅलीतून स्वच्छतेचा संदेश…

मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत अभियानंतर्गत उपक्रम.. कुडाळ : मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत अभियान अंगर्गत आज पिंगुळी ग्राम पंचायतीच्या वतीने स्वच्छता रॅली काढण्यात आली. एका अर्थाने या रॅलीच्या माध्यमातून अभियानाची सुरुवात झाली असून या अभियानात पिंगुळी ग्राम पंचायत उल्लेखनीय कामगिरी बजावेल असा विश्वास सरपंच अजय आकरेकर यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत अभियानाला सुरुवात झाली आहे….

Read Full News

सोनुर्ली श्री. देवी माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी…

⚡सावंतवाडी ता.०६-: महाराष्ट्रातील दक्षिण कोकणचे प्रति पंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देवी सोनुर्ली माऊलीचा वार्षिक जत्रौत्सवाला गुरुवारी ६ रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीपुर्ण वातावरणात प्रारंभ झाला. देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक व गोवा राज्यातूनही भाविक सोनुर्ली नगरीत दाखल झाले होते. दिवसभरात हजारो भाविक देवीचा जयघोष करत माऊली चरणी लीन झाले.तब्बल दोन दिवस चालणाऱ्या सोनुर्ली देवी…

Read Full News

You cannot copy content of this page