⚡कणकवली ता.०१-: स्वामीच्छा पदयात्रा मंडळ, मुंबई ते अक्कलकोट यांच्या वतीने नगराध्यक्ष श्री. संदेश पारकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्कारप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वैभववाडी सहसंपर्क प्रमुख श्री. प्रसाद नारकर उपस्थित होते. यावेळी श्री. संजय जगताप, श्री. सचिन हांडे तसेच श्री. संजय परांजपे यांचीही उपस्थिती होती.
स्वामीच्छा पदयात्रा मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी पदयात्रा मंडळाच्या कार्याला शुभेच्छा देत समाजहिताच्या उपक्रमांना पुढील काळात सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.
