वाहन चालकांनो सावधान!. साटेली येथील रस्त्यावर पडलेला खड्डा वाढतोय…

रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करावी:- वाहनचालकांची मागणी..

⚡सावंतवाडी ता.०१-: मळेवाड ते सातार्डा मुख्य रस्त्यावरील साटेली येथील ग्रामपंचायत शेजारील मुख्य रस्त्यावर पडलेला खड्डा अधिकच रुंदावत आहे.गेले कित्येक दिवस हा पडलेला खड्डा तसाच असून तो अधिकच वाढत आहे.रस्त्याच्या मधोमध पडलेला खड्डा आणि रस्त्यावर असलेले वळण यामुळे वाहनचालकांची एकच धांदल उडत आहे.
खोलवर पडलेला आणि रुंदावत चाललेला खड्डा म्हणजे अपघातास कारणीभूत ठरत असून, संबंधित विभागाने या खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनचालक करत आहेत.

You cannot copy content of this page