Headlines

आरोंदा येथील जिल्हास्तरीय समूहगीत व चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

स्पर्धेला विद्यार्थांनी दिला भरभरून प्रतिसाद..

⚡सावंतवाडी ता.०१-: आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ आरोंदा या संस्थेच्या आरोंदा हायस्कूल व कला वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालयात जिल्हास्तरीय समूहगीत व चित्रकला स्पर्धा (सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग )संपन्न झाल्या.
सदर स्पर्धा ही आरोंदा गावचे सुपुत्र डॉ .पी. वाय .नाईक (ज्येष्ठ संशोधक )यांच्या पत्नी स्वर्गीय पुष्पा प्रभाकर नाईक यांच्या स्मृती प्रित्यर्थ आरोंदा हायस्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या.

स्पर्धेचा शुभारंभ संस्थेचे उपाध्यक्ष बबन नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. चित्रकला स्पर्धा पहिली ते चौथी ,पाचवी ते सातवी ,आठवी ते दहावी अशा तीन गटात घेण्यात आल्या तर समूहगीत स्पर्धा पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन गटात घेण्यात आल्या.
सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक पारितोषिक रुपये ५०००/- रुपये द्वितीय क्रमांकास ३०००/- रुपये तृतीय क्रमांक २०००/- रुपये तर उत्तेजनार्थ १०००/- रुपये बक्षीस ठेवण्यात आले होते.

सदरच्या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:- चित्रकला स्पर्धा (सावंतवाडी , वेंगुर्ला , दोडामार्ग मर्यादित)
गट क्रमांक एक( पहिली ते चौथी )
प्रथम क्रमांक प्रार्थना प्रणय नाईक स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल कोलगाव सावंतवाडी, द्वितीय सार्थक मालवणकर ,स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल कोलगाव सावंतवाडी, तृतीय रामनाथ मेस्त्री ,मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडी तर उत्तेजनार्थ तन्मय गोविंद बावकर जि .प . प्राथ.शाळा साटेली तर्फ सातार्डा.
गट क्रमांक दोन (पाचवी ते सातवी) प्रथम क्रमांक श्रीकृष्ण मोचेमाडकर सेंट फ्रान्सिस स्कूल आजगाव, द्वितीय रुद्रा गोसावी मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव ,तृतीय श्रीराज कारिवडेकर मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव तर उत्तेजनार्थ करिष्मा परब माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय दांडेली

गट क्रमांक तीन (आठवी ते दहावी) प्रथम क्रमांक वर्षा नाईक जनता विद्यालय तळवडे ,द्वितीय रुद्रताली शिरोडकर, गुरु अ.वि बावडेकर विद्यालय शिरोडा ,तृतीय दिव्यांगी धर्णे मिलाग्रेस हायस्कूल सावंतवाडी तर उत्तेजनार्थ सोहम कोरगावकर आर .पी. डी. हायस्कूल सावंतवाडी .

समूहगीत स्पर्धा लहान गट (पाचवी ते सातवी) प्रथम क्रमांक जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कामळेवीर ,द्वितीय जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा उभादांडा नं.१ तृतीय जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ४ तर उत्तेजनार्थ प.पू भालचंद्र महाराज विद्यालय कणकवली नंबर ३ ,जि. प .पूर्ण प्राथमिक शाळा कांदुळी कुडाळ.

मोठा गट (आठवी ते दहावी) प्रथम श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव, द्वितीय नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,तृतीय विभागून जनता विद्यालय तळवडे सावंतवाडी, ओझर विद्यामंदिर कांदळगाव मालवण.
उत्तेजनार्थ विद्याविहार इंग्लिश स्कूल आजगाव उत्तेजनार्थ आरोंदा हायस्कूल .

सदर स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थी व समूह गटांची पारितोषिक वितरण याच दिवशी सायंकाळी चार वाजता प्रशालेचे मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदेश परब प्रायोजक व प्रमुख अतिथी डॉक्टर पी .वाय. नाईक, संस्था सचिव भाई देऊलकर, उपाध्यक्ष बबन नाईक सहसचिव ,अशोक धर्णे, सदस्य रामचंद्र कोरगावकर ,केदार रेगे खजिनदार रुपेश धर्णे, स्नेहा गडेकर आरोंदा सरपंच सायली साळगावकर सामाजिक कार्यकर्ते मनोहर आरोंदेकर, विद्याधर नाईक, ग्रामपंचायत सदस्य स्मिताली नाईक नरेश देऊलकर आदी मान्यवर उपस्थित होते .

या स्पर्धेचे परीक्षण निलेश मेस्त्री व भावेश राणे यांनी केले तर चित्रकला स्पर्धा परीक्षण समीर चांदरकर व मालवणकर सर यांनी केले .
कार्यक्रमाचे पारितोषिक डॉक्टर पी .वाय. नाईक , संस्था अध्यक्ष संदेश परब व पदाधिकारी प्रशालेचे मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले .
यावेळी स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने पुढील वर्षी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे सुतोवात डॉक्टर पी .वाय नाईक यांच्या वतीने आयोजकांनी केले.
यावेळी स्पर्धक ,पालक मार्गदर्शक शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका भावना माजगावकर ,सुप्रिया कोरगावकर तर आभार चंदन गोसावी यांनी मानले.

You cannot copy content of this page