Headlines

सावंतवाडी जिल्हा कारागृहाच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामास ४ कोटींची शासन मान्यता…

सावंतवाडी : जिल्हा कारागृहाच्या मुख्य संरक्षण भिंतीच्या बांधकामाच्या सुमारे ४ कोटी ५ लक्ष ८० हजार २१६ रुपये एवढया रकमेच्या कामास राज्य शासनाच्या गृह विभागाकडून प्रशासकीय मंजूरी प्राप्त झाली आहे‌. माजी मंत्री , आमदार दीपक केसरकर यांच्या सुचनेनुसार कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांनी तसा परीपुर्ण प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसह दिला होता. त्यास मंजूरी मिळाली आहे,…

Read Full News

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.. ⚡सिंधुदुर्गनगरी दि.०७-: राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका -2025 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. जिल्ह्यातील 3 नगर परिषदेसाठी (सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला) आणि 1 नगर पंचायत (कणकवली) साठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान तर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती…

Read Full News

महिमा मोहितेची राज्यस्तरावर झेप; विभागीय स्पर्धेत तिन्ही प्रकारात सुवर्णहॅट्रिक…!

⚡मालवण,ता.०७-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये महिमा मोहिते हिने १०० मीटर, २०० मीटर धावणे व लांब उडी या तिन्ही प्रकारात निर्विवाद वर्चस्व गाजवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. या कामगिरीच्या जोरावर तिने डेरवण, चिपळूण (रत्नागिरी) येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत थरारक…

Read Full News

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सावंतवाडीत ‘हे चांदणे फुलांनी…’ या सुरेल कार्यक्रमाची धमाल…

⚡सावंतवाडी ता.०७-: श्री सद्गगुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने व भाजप नेते श्री विशाल प्रभाकर परब यांच्या माध्यमातून सलग आठव्या वर्षी खास त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गुरुवर्य श्री निलेश मेस्त्री यांच्या निर्मिती- संकल्पनेतून हे चांदणे फुलांनी…. जुन्या नव्या हिंदी मराठी गीतांचा सदाबहार नजराणा या संगीत कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर…

Read Full News

कणकवली येथे ९ नोव्हेंबर रोजी भव्य वारकरी दिंडी सोहळा…

⚡कणकवली ता.०७:सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग तर्फे संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठगमन उत्सव या वर्षी मोठ्या प्राणात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने एक भव्य वारकरी दिंडी (पालखी सोहळा) कणकवली येथे ९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्याचे प्रस्थान सकाळी ८.३० वाजता एस.टी. वर्कशॉप येथील गणेश…

Read Full News

कलमठ येथे श्री काशीकलेश्वर जत्रोत्सवाला पालकमंत्री नाम. नितेश राणे यांची उपस्थिती…

मंदिर परिसरातील गार्डनची केली पहाणी:ग्रामस्थांच्यावतीने ना. नितेश राणे यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान.. ⚡कणकवली ता.०६-: कलमठ गावचे ग्रामदैवत श्री काशीकलेश्वराच्या जत्रोत्सवाला सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी उपस्थित राहून श्री देव कलेश्वराचे दर्शन घेतले. या वेळी देवस्थानच्या मानकऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचे स्वागत केले. तसेच ग्रामस्थांच्यावतीने सरपंच संदीप मेस्त्री…

Read Full News

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या जनसंपर्क व सुविधा केंद्राचा सभापती राहुल नार्वेकर यांनी घेतली दखल…

⚡सावंतवाडी ता.०६-:भाजप युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडीत सुरू केलेल्या जनसंपर्क व सुविधा केंद्राची पाहणी विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी केली. या उपक्रमाचे कौतुक करताना त्यांनी असे केंद्र हे लोकसेवेचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे सांगितले. तसेच अशा प्रकारचा “पॅटर्न” सर्व आमदारांनी आपल्या जिल्ह्यात राबवावा, अशी सूचना त्यांनी केली.या सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण आणि तलावगाव भागातील नागरिकांना…

Read Full News

कुडाळ मध्ये नाईक मराठा मंडळाचा शताब्दी महोत्सव…

कै. डॉ. प्रमोद वालावलकर यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर.. कुडाळ : नाईक मराठा मंडळ मुंबई यांच्यावतीने साहित्य महर्षी गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर स्मृतिदिन आणि शताब्दी महोत्सव कार्यक्रम 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. स्व. मधुकर नारायण उर्फ बाबा आचरेकर स्मृती समाज गौरव प्रदान आरोग्य क्षेत्रातील जनसामान्यांचे देवदूत कै….

Read Full News

मालवणातील मरीन सेंच्युरी प्रश्न स्थानिकांना विचारात घेऊनच सोडविणार….

मालवणातील मरीन सेंच्युरी प्रश्न स्थानिकांना विचारात घेऊनच सोडविणार.. ⚡मालवण ता.०६-:मालवण मरीन सेंच्युरी रद्द करणे सोपे काम नाही. स्थानिक परिस्थिती विचारात घेता, वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने या सेंच्युरीचे क्षेत्र तितकेच ठेवून पुनर्रचना केली आहे. स्थानिक उपजीविकेच्या घटकांना विचारात घेऊनच मालवण मरीन सेंच्युरीला मूर्त स्वरूप दिले जाणार असल्याची माहिती राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन विभाग)…

Read Full News

स्वतःच्या हिंमतीवर रंगभूमी गाजवणाऱ्या कलावंतांना परीक्षकांनी द्यावी योग्य दाद…

प्रकाश कुशे:मालवण येथे राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेला उत्साही सुरुवात.. ⚡मालवण ता.०६-:राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत जे भाग घेतलेले कलावंत आहेत, त्यांना कोणताही गुरु नाही, कोणतेही पाठबळ नाही, ते स्वतःच्या हिंमतीवर नाट्यस्पर्धेत भाग घेऊन आपली कला सादर करतात त्यामुळे परीक्षकांनी या सर्व बाबींचा विचार करून परीक्षण करावे तसेच कलावंतांनी रंगमंचावर साकारलेल्या कलेला इथल्या नाट्यरसिकांनी उदंड प्रतिसाद…

Read Full News

You cannot copy content of this page