चौके येथे घराची भिंत कोसळून नुकसान…

⚡मालवण ता.२४-: सततच्या मुसळधार पावसामुळे चौके – सम्यकनगर येथील सुनील अंकुश चौकेकर यांच्या घराची भिंत आणि छप्पर काल दुपारी कोसळून त्यांचे सुमारे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले. यात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. तलाठी आणि पोलीस पाटील यांना सरपंच पी. के. चौकेकर यांनी या घटनेची माहिती दिली.

ग्रामपंचायत सदस्य दुलाजी चौकेकर, सरपंच पी. के. चौकेकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. तलाठी गुरव आणि पोलीस पाटील रोहन चौकेकर यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. नुकसानग्रस्त ग्रामस्थाला शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सरपंचांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मालवण-कसाल रस्त्यावर कुंभारमाठ येथे पडलेल्या खड्यांमुळे दुचाकी वाहने चालविणे चालकांसाठी मोठे त्रासाचे व कसरतीचे झाले आहे. तसेच देऊळवाडा मंदिरासमोर वळणावरही मोठा खड्डा पडला आहे. या प्रकरणी सरपंच चौकेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सूरज गिरी यांना माहिती देत तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

You cannot copy content of this page