⚡मालवण ता.२०-:
मालवण धुरीवाडा – कुरण येथील श्री स्वामी समर्थांच्या मठात मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा एकोणिसावा वर्धापन दिन सोहळा सोमवार दि. २३ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे.
यानिमित्ताने सकाळी अभिषेक, पूजन, नामस्मरण आणि श्रीभक्त श्री. रवींद्र मनोहर सारंग व सौ. रविना रवींद्र सारंग यांच्या हस्ते श्री सत्यदत्ताची महापूजा आयोजित केली आहे. दुपारी १ ते ४ महाप्रसाद, दुपारी १ वाजल्या पासून तीर्थप्रसाद, सायंकाळी त्रिमूर्ती भक्तिसंगम, मालवण यांचे सुश्राव्य गायन, सद्गुरु वामनराव पै, जीवन विद्या मिशन कोळंब यांचा हरिपाठ आणि श्री सद्गुरु संदानंद माऊली संप्रदाय भजन मंडळ, वायरी यांचे भजन होणार आहे. तरी सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवेकरी – धामापूरकर कुटुंबीय यांनी केले आहे.
