हळवल येथे अमेय मडव यांना ‘समाजमित्र’ पुरस्कार प्रदान…

⚡बांदा ता.२०-: लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल(परबवाडी) हे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना समाजमित्र पुरस्कार देऊन गौरव करतात. शिवजयंतीचे औचित्य साधत लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल (परबवाडी) यांच्या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन पार पडले. दरम्यान मंडळाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा “समाजमित्र” पुरस्कार सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अमेय मडव यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष लवू परब, सचिव दिपेश परब, अरुण राऊळ, दीपक राऊळ, गणेश गावडे, सतीश गावडे, विकास गावडे, पं. स. सदस्य प्रदीप गावडे, उमेश परब, वामन परब, दामोदर परब, बाळकृष्ण परब तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली तालुका उपाध्यक्ष रुजाय फर्नांडिस, सहसचिव यशवंत महाडिक आदी उपस्थित होते.
यावेळी श्री मडव यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी अमेय मडव यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत आणि रक्तदाना संदर्भात मार्गदर्शन केले तसेच तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान क्षेत्रात योगदान देण्याचे आवाहन केले.
फोटो:-
हळवल(परबवाडी) येथे अमेय मडव यांना समाजमित्र पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page