⚡मालवण ता.२४-:
आचरा येथील बंद असलेला बीएसएनएल टाॅवर उबाठा शिवसेना पक्षाच्या प्रयत्नामुळे व माजी आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर दुरुस्त होऊन पून्हा प्रकाशमान झाला आहे. याबाबत आचऱ्याचे माजी सरपंच मंगेश टेमकर यांनी वैभव नाईक यांचे वेधले होते
मालवण तालुक्यातील आचरा गावामधील बीएसएनएल मोबाईल टाॅवर गेल्या पाच दिवसापासून बंद होता. हा मोबाईल टॉवर तात्काळ सुरू करावा, अशी मागणी आचरा माजी सरपंच मंगेश टेमकर यांच्यासह आचरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली होती. माजी आमदार वैभव नाईक यांनी तात्काळ याची दखल घेत बीएसएनएल अधिकारी श्री.गोवेकर यांच्याशी संपर्क साधत बंद असलेला बीएसएनएल टॉवर चालू करण्याच्या सूचना दिल्या. अधिकाऱ्यांनी याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्यावर कर्मचाऱ्यांनी टाॅवर मधील तांत्रिक बिघाड दूर करुन टाॅवर चालू केला. त्यामुळे गेले कित्येक दिवस बंद असलेला टाॅवर अखेर मंगळवारी पुर्ववत चालू झाल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे. हा टाॅवर चालू व्हावा यासाठी आचरा माजी सरपंच मंगेश टेमकर ठाकरे शिवसेना आचरा विभागातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले.