कुंभवडे, दारिस्ते गावच्या समस्यावर केली चर्चा:शाळेतील मुलांची होणारी गैरसोय दूर करा; सुशांत नाईक..
⚡कणकवली ता.२४-: गेले काही दिवस दुपारी 12.15 वा कणकवली वरून कुंभवडे ला सुटणारी एस.टी कुंभवडे ला दुपारी 2.30 वाजता येते तसेच सायंकाळी 5.45 ची कणकवली कुंभवडे रात्री 8.30 वाजता कुंभवडे गावात येते. यामध्ये सकाळी सुटणाऱ्या कुंभवडे एस.टी.मध्ये शाळेतील मुले असतात तसेच सायंकाळी 5.45 वा सुटणाऱ्या कुंभवडे एस.टी मध्ये कॉलेज ची मुळे असतात. यामुळे शाळेतील मुलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच गावातील नागरिकांना देखील यामुळे कणकवली वरून ये जा करण्यासाठी विलंब होत आहे. यासाठी सकाळी व सायंकाळी कणकवली वरून सुटणारी कुंभवडे एस.टी ही वेळेत सोडावी.अश्या अनेक समस्या घेऊन आज युवासेनेच्या शिष्टमंडळाने एस. टी.महामंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी एस.टी महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी, देशमुख व सहाय्य्क वाहतूक अधीक्षक, कुबडे मॅडम यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना तालुकाप्रमुख तथा एस. टी. कामगारसेना तालुकाध्यक्ष उत्तम लोके. युवासेना तालुका समन्व्यक तेजस राणे, गुरुनाथ पेडणेकर, युवासेना कलमठ शहरप्रमुख धीरज मेस्त्री उपस्थित होते.
सुशांत नाईक म्हणाले, तालुक्यातील शाळेतील मुलांची गैरसोय करू नका. शाळेच्या वेळेवर एस. टी सोडण्यात यावी याची दक्षता द्या.गेल्या 2 वर्षांपासून दारिस्ते येथील शाळेतील मुलांसाठी सकाळी 9 वाजता चालू असणारी एस. टी बंद करण्यात आली यामुळे दारिस्ते गावातील शाळेतील मुलांना ये जा करण्यासाठी सुमारी दीड किलोमीटर चा पायी प्रवास करावा लागत आहे. शाळेतील मुलांची होणारी गैरसोय दूर करा व दारिस्ते एस.टी चालू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. येत्या 15 दिवसात आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही शाळेतील मुलांना घेऊन एस. टी कार्यालया समोर आंदोलन करू असा इशारा यावेळी युवासेनेच्या शिष्टमंडळाने दिला.