⚡सावंतवाडी ता.२०-: शिवजयंतीचे औचित्य साधून आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक पोशाख घालून कार्यक्रमात रंगत आणली.
शिवजयंती निमित्त प्रशालेत सकाळी शिवप्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक पोशाख घालून इतिहास जागा केला तसेच महाराजांच्या जीवनावर आधारित काही प्रसंग उभे केले तर काही विद्यार्थ्यांनी पोवाडा,गीत,वक्तृत्व सादर केले.
यानंतर विद्यार्थी ,शिक्षक,पालक,ग्रामस्थ यांनी कोंडुरे येथून मळेवाड जकात नाका येथे भव्य रॅली काढून मळेवाड जंक्शन येथे महाराजांच्या जीवनावर आधारित काही प्रसंग,पोवाडा,गीत, सादर करत नागरिकांची वाहवा मिळवली.यावेळी येथील परिसर शिवमय झाला होता.
या कार्यक्रमात प्रशालेचे मुख्याध्यापक शिरीष नाईक शिक्षक अनिल नाईक,तानाजी वरक, श्रद्धा मुळीक, देवयानी चव्हाण,मिताली नाईक, तानाजी वरक ,कृपा नेमळेकर, शिक्षकेतर कर्मचारी तानाजी खोत तसेच चेतन आरोसकर,पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
