शिवजयंती निमित्त वसुंधरा जनकल्याण फाउंडेशनतर्फे वृक्ष वाटप…

⚡मालवण ता.२०-:
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वसुंधरा जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने मालवण एस टी स्टँड येथे वृक्ष वाटप अभियान संपन्न झाले. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ४० नागरिकांना मोफत झाडे वाटप करण्यात आली.

या उपक्रमाचे उद्घाटन वाहतूक निरीक्षक स्वप्नील गडदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. वृक्ष लागवड ही काळाची गरज असून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तर उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेसोबतच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने पार पाडावी, असे आवाहन केले.

या कार्यक्रमास वाहतूक निरीक्षक स्वप्नील गडदे, लिपीक दिलीप हिंदळेकर, जनार्दन मांजरेकर , वसुंधरा जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. ऐश्वर्य मांजरेकर, सदस्य स्वप्नील मिटकर, राज्य परिवहन मंडळचे चालक वाहक व कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला बचतगट सदस्य तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page