⚡मालवण ता.२०-:
दुर्ग मावळा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग, दुर्गरक्षक प्रतिष्ठान, रेडी आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानव विकास संस्थेने मसुरे देऊळवाडा जि. प. पूर्ण प्राथमिक शाळेत इतिहासाची साधनांचे प्रदर्शन संपन्न झाले. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना शिवकालीन हत्यारे अनुभवता आली.
यावेळी ज्ञानेश्वर राणे यांनी शिवरायांच्या इतिहासातील सुवर्णक्षणांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच विविध भौतिक, लिखित व मौखिक साधनांचे सादरीकरण केले. प्राचीन किल्ले व प्रकार, शिलालेख, नाणी यांची विद्यार्थ्यांना हाताळून माहिती दिली. तलवारीचे विविध प्रकार व त्यांचा प्रसंगानुरुप केला जाणारा उपयोग याविषयी मार्गदर्शन केले. उपक्रमातून शिवकालीन इतिहासाचे जतन व्हावे व विद्यार्थ्यांच्या मनात स्फूर्ती निर्माण व्हावी, हा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी केंद्रप्रमुख नारायण देशमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सीताराम लाकम, अशोक बागवे, प्रकाश राणे, मुख्याध्यापक गुरुनाथ ताम्हणकर, तेजल ताम्हणकर, कविता सापळे, विनोद सातार्डेकर, दर्शन हजारे व पालकांनीही उपक्रमाचा लाभ घेतला.
