रिक्षा चालकांना ‘आरोग्य किट’ भेट…

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम..

⚡सावंतवाडी,ता.२४-: प्रवाशांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या तीन आसनी रिक्षा चालकांचे आरोग्य उत्तम राहावे, या उद्देशाने त्यांना प्राथमिक उपचारासाठी उपयुक्त ठरणारे आरोग्य किट प्रदान करण्यात आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने सावंतवाडी येथील मळगाव रेल्वे स्थानक परिसरातील सुमारे ६८ रिक्षा चालक-मालकांना हे आरोग्य किट भेट देण्यात आले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांच्या हस्ते हे किट वाटप करण्यात आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी रिक्षा चालकांचा हा विशेष सन्मान करण्यात आला. २४ ते २७ जुलै या कालावधीत वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना श्री. राऊळ यांनी रिक्षा चालकांना आश्वस्त केले की, “आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही कधीही हाक मारा, निश्चितपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष तुम्हाला सहकार्य करेल.”

या कार्यक्रमास शिवसेनेचे नेते चंद्रकांत कासार, तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, अशोक धुरी, संदीप पांढरे, विनोद काजरेकर, सुनील गावडे, फिलिप्स रोड्रिक्स, गुणाजी गावडे, नम्रता झारापकर, बाबू गावडे, प्रशांत बुगडे, शरद जाधव, नेमळे उपसरपंच राऊळ, मंथन गवस, रोहन मल्हार, संदीप भाईत, संजय धुरी, सचिन मुळीक, रिक्षा संघटना व सहा आसनी रिक्षा संघटना चालक-मालक, शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page