राजकोट किल्ला परिसरात रात्रीच्या वेळी प्रेमीयुगुलांचा वावर…

राजकोटचे पावित्र्य जपले जावे ; शिल्पा खोत यांची मागणी.. ⚡मालवण ता.१७-:राजकोट येथील शिवपुतळ्याच्या परिसरात रात्रीच्यावेळी मद्यपी आणि प्रेमीयुगलांचा वावर होत असल्याने राजकोट किल्ला व शिवपुतळ्याचे पावित्र्य राखले जाणे आवश्यक असून यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी मालवण मधील शिवप्रेमी सौ. शिल्पा खोत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोकण प्रादेशिक मुख्य अभियंता शरद राजभोज यांच्याकडे केली. मालवण…

Read More

सेवानिवृत्त शिक्षकांना १ तारीखलाच मानधन द्या…

सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघाचे सी ई ओ यांना निवेदन.. सिंधुदुर्गनगरी ता १७सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त शिक्षकांचे माहे मे महिन्याचे निवृत्तीवेतन अद्याप मिळालेले नाही .याकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच शासन निर्णयाप्रमाणे दरमहा १ तारीखलाच निवृत्ती वेतन मिळावे. अशी मागणी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी…

Read More

शासनाच्या विरोधात माध्यमिक अध्यापक संघाचे धरणे…

सिंधुदुर्गनगरी ता १७शालेय शिक्षण विभागाने मान्यताप्राप्त खासगी शाळांसाठी प्रस्तुत केलेले शिक्षक विरोधी शासन निर्णय रद्द करण्यात यावे या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. याबाबतचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्रासारख्या प्रगत व पुरोगामी राज्यातील केवळ शासकीय बचतीसाठी शासनाकडून घेतल्या गेलेल्या या…

Read More

उच्चशिक्षणाने स्वतःसोबत समाजाचे नाव उंचवा…

रुपेश पावसकर:कट्टा येथे गुणगौरव सोहळा.. कुडाळ : आजचे स्पर्धात्मक युग असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने स्पर्धक बनले पाहिजे. आणि काहीतरी वेगळं करायचं असं प्रत्येक विद्यार्थ्याने ठरवलं पाहिजे. आज मुलांना मोबाईल, गाडी याची भुरळ पडत चलली आहे. पण ह्या सर्व गोष्टी तुमच्या शैक्षणिक ज्ञानापुढे फिक्या आहेत. उच्च शिक्षण घेऊन मोठे झालात तर तुमचे नाव समाजात अभिमानाने घेतले जाईल…

Read More

भाजप शिष्टमंडळाने दिली बांदा पीएचसीला भेट, सोयी सुविधांचा घेतला आढावा…

⚡बांदा ता.१७-: पावसाळा सुरू झाल्यावर दरवर्षी बांदा व परिसरात साथीचे रोग तसेच गंभीर असे डेंग्यू, मलेरिया, तापसरी ते आजार मोठ्या प्रमाणात वाढू लागतात. त्याकरिता पूर्व खबरदारी म्हणून आज बांदा भाजपच्या शिष्टमंडळाने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राची भेट घेतली व तेथील सोयी सुविधा,औषधांची पर्याप्तता, तसेच इतर सर्व अत्यावश्यक गोष्टींचा आढावा घेतला. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग…

Read More

वेंगुर्लेतील मठ चेकपोस्टवर पोलिसांनी पकडली 60 लाखाची गोवा बनावटीची दारु…

⚡वेंगुर्ले ता.१७-: राजस्थान राज्यातील सुरखंडा खेडा येथील धर्मेशकुमार पुरुषोत्तम चोबीसा (४४) यांस मंगळवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारांस मठ तिठा (मठ चेकपोस्ट नजीक) वेंगुर्ले 60 लाख रूपयांची रॉयल ब्ल्यू व्हिस्की वदेशी दारु टँगो पंच नामक गोवा बनावटीच्या दारू बेकायदा, बिगर परवाना आयशर टेम्पोमधून वाहतूक करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गच्या पोलीस पथकाने रंगेहाथ पकडले. गोवा…

Read More

सावंतवाडीत उद्या कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या नवीन शाखेचे उद्घाटन…!

सावंतवाडी, दि. १७ (प्रतिनिधी):कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सावंतवाडीच्या नवीन शाखेचे भव्य उद्घाटन उद्या बुधवार, दि. १८ जून रोजी सकाळी ११ वाजता रत्नेश प्लाझा, साळईवाडा येथे होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास रेक्टर मिलाग्रीस कॅथेड्रल रेव्ह. फा. मिलेट डिसोजा, श्रीमती. अॅमी डॉक्टर तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. सोपान शिंदे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सुजय…

Read More

पीएम श्री दत्त विद्यामंदिर वैभववाडी शाळेत विद्यार्थी प्रवेशोत्सव गटविकास अधिकारी आर डी जंगली यांची उपस्थिती उत्साहात संपन्न…!

वैभववाडी प्रतिनिधी.शैक्षणिक वर्ष 2025 -26 च्या शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव या कार्यक्रमांतर्गत पीएम श्री दत्त विद्यामंदिर वैभववाडी येथे दाखल होणाऱ्या नवीन मुलांचे प्रभात फेरी, औक्षण, पहिले पाऊल ठसा, वाजत गाजत दिमाखदार पद्धतीने गटविकास अधिकारी आर डी जंगले यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.शाळा प्रवेशोत्सव या कार्यक्रमासाठी 100 शाळा भेटी अंतर्गत आर डी जंगले गटविकास अधिकारी,…

Read More

वायंगणी-कांबळीवाडी येथील युवकाचा मृतदेह आढळला विहीरीत…!

⚡वेंगुर्ला ता.१७-: वायंगणी- कांबळीवाडी येथील ३२ वर्षीय युवक कल्पेश एकनाथ कांबळी याचा मृतदेह वायंगणी-नांद्रुकवाडी येथील विहिरीतमध्ये सोमवारी मध्यरात्री आढळून आला. या प्रकरणी वेंगुर्ला पोलीसांत अकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.वायंगणी-साळगांवकरवाडी येथील सिताराम सत्यवान माडये यांनी या घटनेची खबर वेंगुर्ल पोलीसांत दिली. वायंगणी-कांबळीवाडी येथील कल्पेश एकनाथ कांबळी (३२) हा दि. १६ जून रोजी सायंकाळी ७ वाजता घरी…

Read More

वेंगुर्ले वीज कार्यालयात जोडलेली ‘ती’ गावे सावंतवाडीत जोडा…

वारंवार समस्या येत असल्याने ग्राहक त्रस्त:रुपेश राऊळ यांचा घेराव घालण्याचा इशारा सावंतवाडी:सावंतवाडी तालुक्यातील जवळपास २० गावे वीज महावितरण कंपनीच्या वेंगुर्ले तालुका कार्यालयाशी जोडली गेल्याने स्थानिक ग्राहकांना प्रचंड मनस्ताप आणि आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. सध्या वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या घटनांमुळे ग्राहक त्रस्त असून, तक्रारींसाठी वेंगुर्ले येथील कार्यालयात जावे लागत असल्याने वेळ आणि पैशाचा अपव्यय…

Read More
You cannot copy content of this page