आरोंदा मतदारसंघात सुधा कवठणकर यांची प्रचारात जोरदार मुसंडी…

शेवटच्या दिवशी प्रचारात आघाडी: एकतर्फी विजय होणार, कार्यकर्त्यांना विश्वास..

सावंतवाडी ता.०५-: आरोंदा मतदारसंघात सुधा कवठणकर यांनी निवडणूक प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत मतदारांशी थेट संवाद साधला. विकासाच्या मुद्द्यावर विश्वास ठेवून मतदानाच्या रूपाने मला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले.

आरोंदा मतदारसंघात सध्या चुरशीची लढत पाहायला मिळत असली तरी सुधा कवठणकर हे आघाडीवर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. “आमचं मत विकासासाठी असून सुधा कवठणकर यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत,” अशी भावना अनेक मतदारांनी व्यक्त केली.
नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता कवठणकर यांची ताकद अधिकच वाढत असून ते विरोधकांना मोठ्या फरकाने मात देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदारसंघात त्यांच्या विजयाची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.

You cannot copy content of this page