विकास हाच माझा एकमेव ध्यास…

संदीप गावडे: मतदारांनी मला मतांच्या रूपाने आशीर्वाद द्यावेत..

⚡सावंतवाडी ता.०५-:
मला कोणावरही वैयक्तिक टीका करायला आवडत नाही. विकास आणि जनतेचे हित हाच माझा एकमेव ध्यास असून, त्याच उद्देशाने मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. तळावडा मतदारसंघाचा सर्वांगीण कायापालट करण्याचा माझा निर्धार आहे. त्यामुळे मतदारांनी मला मतांच्या रूपाने आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन संदीप गावडे यांनी केले.

ते म्हणाले की, या मतदारसंघातून कुठलाही वैयक्तिक हेतू साधण्यासाठी मी निवडणूक लढवत नाही. या परिसराचा विकास व्हावा, लोकांच्या मूलभूत प्रश्नांना न्याय मिळावा, यासाठीच मी मैदानात उतरलो आहे. मी कधीही कोणावर वैयक्तिक टीका केली नाही आणि करणारही नाही. माझी संपूर्ण निवडणूक प्रचाराची भूमिका ही विकासाभोवती केंद्रित असून, शेवटपर्यंत मी विकासाच्या मुद्द्यावरच लढा देणार आहे.
तळावडा मतदारसंघातील सुजाण जनता मला नक्कीच आशीर्वाद देऊन निवडून देईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, संदीप गावडे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून, मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

You cannot copy content of this page