कणकवली शहरात ५ जनावरांचा दुर्दैवी मृत्यू…

कणकवली : शहरात टेबवाडी येथे सुवर बाजार च्या मागील शेतात ५ जनावरांचा अचानक मृत्यू झाला आहे. नेमका मृत्यू कसा झाला ? हे माहित नसलं तरी वैद्यकीय अधिकारी यांनी विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मृत जनावरांमध्ये ४ म्हैशी आणि एका गायीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शेतकरी राकेश अशोक राणे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती समजतात नगराध्यक्ष संदेश पारकर, नगरसेवक बंडू हर्णे व स्थानिक नागरिक दाखल झाले आहेत. यावेळी तलाठी, पशुवैद्यकीय अधिकारी हे उपस्थित आहे नेमका जनावरांचा मृत्यू कसा झाला? याबाबत तपास करणे आवश्यक आहे, अशी मागणी केली जात आहे.

You cannot copy content of this page