Headlines

नारळी पौर्णिमेच्या दिवशी नदीत वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह शोधण्यात यश….

के.एस.आर. ग्लोबल एक्वेरियम.च्या स्कुबा डायव्हर्सची कामगिरी.. ⚡सावंतवाडी ता.३१-: कुडाळ तालुक्यातील ओरोस परिसरातील पीठ ढवळ नदीमध्ये नारळी पौर्णिमेच्या दिवशी वाहून गेलेल्या विजय जगले या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. सावंतवाडी तालुक्यातील केसरी येथील ‘के एस आर ग्लोबल एक्वेरियम’ (KSR) मधील दोन तरुण स्कुबा डायव्हर्सनी आपल्या जीवाची बाजी लावून हा मृतदेह शोधून काढला.नारळी पौर्णिमेच्या दिवशी…

Read More

मूर्तीकार विलास मांजरेकर यांचा ‘कोकण कलारत्न’ पुरस्काराने सन्मान…

संजू परब यांनी घेतली सदिच्छा भेट; पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा.. सावंतवाडी, ता. ३१ : प्रसिद्ध मूर्तीकार विलास मांजरेकर यांना कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘कोकण कलारत्न’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले.मांजरेकर यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून कोकणच्या सांस्कृतिक व कलात्मक परंपरेला वेगळी ओळख मिळवून दिली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय…

Read More

आसोलीत अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; तब्बल ५२ विद्यार्थ्यांचा सहभाग…

⚡वेंगुर्ला ता.३१-: शिवसेना वेंगुर्ला आणि आसोली- फणसखोल शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आसोली गाव मर्यादित इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अभंग गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. युवासेना तालुकाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल गावडे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा उत्कृष्ट नियोजन आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात…

Read More

श्रावणी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले कणकवलीतील स्वयंभू मंदिरात दर्शन

प्रत्यक्ष फिल्डवर गेल्याने नागरिकांच्या समस्या समजण्यास मदत – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे कणकवली : प्रशासनातील अधिकारी म्हणून प्रत्यक्ष फिल्डवर आल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि प्रश्न समजून घेण्यास अधिक मदत होते, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. श्रावणी सोमवारनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सोमवारी कणकवली शहरातील श्री स्वयंभू मंदिराला भेट देत भगवान महादेवाचे दर्शन…

Read More

लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या वतीने हळवल-शिवडाव मार्गावर स्वच्छता मोहीम…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढलेली झाडी तोडून खड्डे बुजविले ⚡कणकवली ता.३१-: लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. हळवल शिवडाव मार्ग तसेच मंदिर परिसर व इतर भागात वाढलेली झाडी तोडून खड्डे बुजवून ही मोहीम राबविण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भूमीवर ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.हळवल गावातील हळवल ते शिवडाव जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात…

Read More

वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा संकल्प; संतोष बोडके यांच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡वैभववाडी ता.३१-: वाढदिवस म्हटला की उत्सव, शुभेच्छा आणि आनंदाचा सोहळा डोळ्यांसमोर येतो. मात्र, आपल्या वाढदिवसाचा आनंद समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्याची प्रेरणादायी परंपरा वैभववाडी तालुक्याचे युवा कार्यकर्ते धनगर समाज भवन समितीचे सचिव संतोष बोडके यांनी वाढदिवसानिमित्त जय मल्हार दुर्गोबा मंडळ अचिर्णे भाऊ भैयाजी गोरे ट्रस्ट,मित्रपरिवार, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे रक्तदान…

Read More

मन की बात’मधून मोदींचा नशामुक्त भारताचा संदेश…

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाहिले थेट प्रक्षेपण.. ⚡सावंतवाडी ता.३०-:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या १३७ व्या भागाचे थेट प्रक्षेपण भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आपल्या केसरी येथील केएसआर ग्लोबल एक्वेरियम येथे पाहिले.या भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प, युवकांसाठी नशामुक्त भारताचा…

Read More

बिरोडकर टेंबचे लाडके ‘भाऊ’ हरपले!

ज्येष्ठ नागरिक गंगाराम उर्फ भाऊ बिरोडकर यांचे ७७व्या वर्षी निधन; मनमिळाऊ स्वभावामुळे परिसरात होते सर्वांचे लाडके ⚡सावंतवाडी,ता.३०-: न्यू सबनिसवाडा-बिरोडकर टेंब येथील रहिवासी, ज्येष्ठ नागरिक तथा बिरोडकर टेंब कला-क्रीडा मंडळाचे सल्लागार गंगाराम उर्फ भाऊ सखाराम बिरोडकर यांचे आज दुपारी १ वाजता वयाच्या ७७व्या वर्षी निधन झाले. गेल्या तीन वर्षांपासून ते आजारी होते. अर्धांगवायूच्या आजाराशी झुंज देत…

Read More

चिवला बीचवरील ‘मृत्यूचा सापळा’ अखेर हटला…

बाबी जोगी यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महावितरणची तत्काळ कार्यवाही.. ⚡मालवण,ता.३०-:स्वच्छ, सुंदर आणि चंदेरी वाळूसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरातील चिवला बीचवर गेल्या १० दिवसांपासून धोकादायक स्थितीत पडलेला विजेचा पोल आणि चालू विद्युत केबल अखेर महावितरण विभागाने तातडीने हटवून त्या ठिकाणी नवीन पोल उभारला आहे. शिवसेना शहर प्रमुख बाबी जोगी यांनी महावितरण अधिकाऱ्यांना भेटून आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा…

Read More

माजी जि प अध्यक्षा सौ सरोज परब यांच्या आकस्मिक निधनाने मन हेलावून गेले

आमदार निलेश राणे यांची सरोजताईना श्रद्धांजली मालवण दि प्रतिनिधी १९९० पासून राणे साहेबांच्या सोबत निष्ठेने आणि समर्पित भावनेने काम करणाऱ्या ज्येष्ठ सहकारी तथा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ सरोज शिवाजी परब यांच्या आकस्मिक निधनाने मन हेलावून गेले, अशा शब्दांत कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सरोजताईंना श्रद्धांजली अर्पण केली. सरोज परब यांनी प्रदीर्घ काळ सामाजिक…

Read More
You cannot copy content of this page