कास नंबर २ शाळेचा अभिनव उपक्रम…

विद्यार्थी – शाळेसाठी सहकार्य करणाऱ्या दात्यांचा करण्यात आला सन्मान:महिलांसाठीही हळदीकुंकू समारंभाचे करण्यात आले होते नियोजन..

⚡सावंतवाडी ता.१७-: जि. प. प्रा. शाळा कास नंबर २ भाईपवाडी ही शाळा उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते.या शाळेतील विद्यार्थी विविध स्तरावर आपली चमक दाखवित आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाली यासाठी तसेच गावातील व्यक्तींनी शाळेसाठी सहकार्याच्या भावनेतून केलेली मदत याबाबत त्यांचा सन्मान व्हावा या हेतूने कास शाळा नंबर २ ने विद्यार्थी व दात्यांच्या सन्मानपर खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी भाई भाईप, शंकर भाईप ,धनंजय केरकर ,स्वागता केरकर ,नारायण भाईप, अजय भाईप, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिव्या भाईप, संदेश भाईप, सदानंद भाईप, नागेश भाईप, संतोष भाईप, धोंडू मेस्त्री ,पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.

कास शाळा नंबर २ शाळेच्या वतीने शाळेच्या माजी शिक्षिका स्वागता धनंजय केरकर, वीरगाथा ५.० साठी निवड झालेली शमिका सदू गवंडी,भाई भाईप,शंकर भाईप,लक्ष्मण गोविंद गावडे,नेहा धोंडू मेस्त्री, खुशी विश्वनाथ भाईप,ज्येष्ठ नागरिक सदानंद भाईप,मदन मुरकर यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ,गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी उपस्थित निवृत्त शिक्षक धनंजय केरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, खरोखरच शाळेच्या वतीने केलेला विद्यार्थ्यांचा,शाळेसाठी सहकार्य करणाऱ्या दात्यांचा सन्मान कार्यक्रम इतरांसाठी प्रेरणादायी असून,मराठी शाळेत शिकणारी मुले कुठेही कमी पडत नाहीत तर मराठी माध्यमातून शिक्षण घेणारी मुले मोठ्या पदावर असून आपणही आपल्या मुलांना मराठी शाळेत घालण्याचे आवाहन केले.

तसेच उपस्थित मान्यवर भाई भाईप यांनी सुद्धा शाळेच्या शिक्षकांबद्दल ,पालकांबद्धल गौरवोद्गार काढले आणि शाळेच्या उपक्रमाबद्दल आपण नेहमीच सहकार्य करणार असल्याचे सांगून,शाळेच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी एकत्र येत शाळेचं , गावाच नाव मोठ करण्याच आवाहन त्यांनी केले तसेच शाळेच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार समारंभ निमित्त त्यांनी समाधान व्यक्त केले.
मुख्याध्यापिका उत्कर्षा परब यांनी शाळेसाठी रंगरंगोटी,बोलक्या भीती करण्यासाठी सहकार्य केलेल्या दात्यांचे आभार मानले.

यावेळी मराठी संस्कृतीतील सामाजिक ,धार्मिक समारंभ हळदी कुंकूचेही आयोजन शाळेत करण्यात आले,या समारंभात सुहासिनींनी एकत्र येत मोठ्या उत्साहात हळदी कुंकू समारंभ साजरा करत,एकमेकांना हळद कुंकू लावून वाण दिले.त्याच प्रमाणे सर्व सुहासिनी महिला एकत्र येत चांगल्या विचारांची सुध्दा देवाणघेवाण करत शाळेने राबविलेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.या उपक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.

या उपक्रमासाठी शाळेच्या शिक्षिका उत्कर्षा परब,मनिषा गावडे , शाळा व्यवस्थापन अध्यक्षा दिव्या भाईप, पूजा भाईप व महिलांनी योग्य असे नियोजन केले होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना शिक्षिका उत्कर्षा परब तर आभार प्रदर्शन मनीषा गावडे यांनी मानले.
यावेळी पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

You cannot copy content of this page