नेमळे धनगरवाडी येथील असंख्य ग्रामस्थांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश…

जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे यांच्या हस्ते व सावंतवाडी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अँड.अनिल निरवडेकर यांच्या उपस्थितीत प्रवेश:नेमळे गावचे माजी सरपंच विनोद राऊळ यांच्या विशेष पुढाकार..

⚡सावंतवाडी ता.१७-: भारतीय जनता पार्टीच्या विचारांवर विश्वास ठेऊन नेमळे धनगरवाडी येथील असंख्य ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे तसेच सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भरगोस असा निधी धनगर समाजाच्या वाड्यांच्या विकासासाठी आजपर्यंत देण्यात आलेला आहे. यापुढे देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अशा प्रकारचा निधी उपलब्ध होईल व या वाडीचा विकास नक्की होईल असे श्री गावडे म्हणाले. हा प्रवेश नेमळे गावचे माजी सरपंच विनोद राऊळ यांच्या विशेष प्रयत्नांनी पार पडला. यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक विलास गावडे, शक्तिकेंद्र प्रमुख गौरव मुळीक, गेळे सरपंच सागर ढोकरे, तसेच नेमळे गावातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page