⚡मालवण ता.१७-:
मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी येथील जत्रेचा वड येथे दि. १२ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. श्रींची आरती आणि तीर्थप्रसाद, सायंकाळी ७ वा. सुस्वर भजन, रात्री ९.३० वा. भजनप्रेमी स्व. अनिल जयवंत हडकर आणि राजा बैल यांच्या स्मरणार्थ अनिकेत अनिल हडकर आणि स्वराज अनिकेत हडकर पुरस्कृत तिरंगी भजन बारी सामना होणार आहे. यामध्ये बुवा विजय (गुंडू) सावंत, बुवा संदीप लोके, बुवा संदीप पुजारे यांच्यात तिरंगी बारी रंगणार आहे. तरी सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
चिंदर जत्रेचा वड येथे १२ फेब्रुवारीला विविध कार्यक्रम…
