⚡देवगड ता.१७-:
शेठ म. ग. हायस्कूल देवगड येथील विद्यार्थ्यांनी शासकीय रेखाकला परीक्षा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत एलिमेंटरी ग्रेड व इंटरमिजिएट ग्रेड या दोन्ही परीक्षांचा शंभर टक्के निकाल साध्य केला आहे. या यशामुळे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता आणि कला शिक्षणातील परंपरा अधोरेखित झाली आहे.
या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे चित्रकला शिक्षक राजेंद्र कोयंडे यांचा शाळेचे मुख्याध्यापक प्रविण खडपकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
देवगड केंद्राचा एकूण निकाल पाहता एलिमेंटरी ग्रेडसाठी २७३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी २७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९९.२६ टक्के लागला आहे. इंटरमिजिएट ग्रेडसाठी २३९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी २३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९९.५८ टक्के आहे.
शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथील एलिमेंटरी ग्रेडसाठी २९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून सर्व २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या गटात A ग्रेड प्राप्त करणारे विद्यार्थी हर्षदा अर्जुन शिवणगेकर, किमया प्रताप मोंडे, पल्लवी छबिलाल ठाकरे, पार्थ सुभाष ठुकरुल, प्रांजल मिलिंद कुबल, पूर्वी रवींद्र कोयंडे व समृद्धी नितीन खंडागळे आहेत. B ग्रेड प्राप्त करणारे विद्यार्थी आर्या अभिषेक पाटकर, आर्या जितेंद्र करंगुटकर, अनन्या सचिन ओगले, चैतन्य गणेश कोयंडे, मुग्धा प्रताप मोंडे, प्रियल प्रमोद मिरजकर, रुबा सर्फराज शेखजमादार, साक्षी अभय पवार, सलोनी मोहन पाटील, सलोनी संतोष केळुसकर व विराज विनोद चौगुले असून C ग्रेड प्राप्त विद्यार्थी ११ आहेत.
इंटरमिजिएट ग्रेडसाठी शाळेतून ३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते व सर्व ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल १०० टक्के लागला आहे. या गटात A ग्रेड प्राप्त करणारे विद्यार्थी केतकी प्रकाश आंबेरकर, सानवी समीर मर्गज व शशांक शैलेश खाडिलकर आहेत. B ग्रेड प्राप्त करणारे विद्यार्थी आदित्य हेमंत शिंगाडे, भार्गवी विशाल चौगुले, चैत्राली संदीप कोयंडे, हुमेरा दिलशाद शेख, जिया शमशुद्दीन हवालदार, मनुश्री मुकुंद काळदाते, सिया यतीन कुळकर्णी, सृष्टी योगेश डोईफोडे व स्वराली संदीप मिराशी असून C ग्रेड प्राप्त विद्यार्थी १९ आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले असून त्यांना चित्रकला शिक्षक राजेंद्र कोयंडे यांचे प्रभावी मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक प्रविण खडपकर, पर्यवेक्षिका सौ. निशा दहिबावकर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
