नट वाचनालयात प्रकट वाचन स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.१७-: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून शालेय मुलांसाठी नट वाचनालयात प्रकट वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दिनांक २४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता नट वाचनालयाच्या सभागृहात संपन्न होणार आहे.
सदर स्पर्धा सावंतवाडी तालुका मर्यादित असून ती इयत्ता ५ वी ते ७ वी व इयत्ता ८ वी ते १० वी अशा दोन गटांत घेण्यात येणार आहे. प्रत्येक गटातून एका शाळेतील फक्त दोनच स्पर्धक स्वीकारले जाणार आहेत.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन मराठी भाषेचे संवर्धन घडावे, हा उद्देश आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन नट वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page