वेंगुर्ला येथे उद्या राज्यस्तरीय आदर्श शेतकरी पुरस्कार वितरण कार्यक्रम…

⚡वेंगुर्ला ता.१७-: सिंधुदुर्ग लोक शिक्षण संस्था, वेंगुर्ला आणि कृषि तंत्र निकेतन, देवगड.यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगत, नाविन्यपूर्ण आणि प्रेरणादायी शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी आदर्श शेतकरी पुरस्कार २०२५ साठी आलेल्या नामांकन मधून परीक्षणअंती महाराष्ट्र राज्यातील १४ शेतकऱ्यांना उद्या रविवार दि. १८ जानेवारी रोजी वेंगुर्ला येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. राज्यस्तरीय आदर्श शेतकरी पुरस्कार – २०२५ चे मानकरी डॉ. उत्तम सूर्यकांत फोंडेकर (मालवण),नारायण अशोक रायकर (ठाणे),ऋषिकेश बाळासाहेब काळे – (करमाळा,सोलापूर), वृषाल विजय ठाकूर( वेंगुर्ला), महेश दिनकर सावंत (देवगड), गजानन विष्णू परब – (कुडाळ), विवेक शांताराम चव्हाण (शिरगाव), चंद्रकांत लक्ष्मण पवार – (म्हसळा. रायगड). विजय हनुमंत मोरे (तासगाव सांगली), पांडुरंग कुंडलिक बरळ इंदापूर पुणे, महेश रामदास संसारे ( वैभववाडी सिंधुदुर्ग),डॉ.संभाजी अर्जुन भोसले – (बारामती पुणे), चेमा रामजी गावीत ता. नवापूर जिल्हा नंदुरबार, अरुण बळीराम मगर (पुणे). हा पुरस्कार वितरण कार्यक्रम सकाळी 10 वाजता सिंधुदुर्ग लोक शिक्षण संस्था वेंगुर्ला ऑफिस वेंगुर्ला, येथे आयोजित कार्यक्रमात होणार आहे. तरी या सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग लोकशिक्षण संस्था वेंगुर्ला अध्यक्ष विनायक ठाकूर व कृषी तंत्रनिकेतन देवगड अध्यक्ष नारायण सावंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page