विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धात सहभागी होऊन कॉलेजचे नाव देशपातळीवर न्यावे-:जयप्रकाश चमणकर…

⚡वेंगुर्ला ता.१७-: वेंगुर्ला तालुक्यातील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविदयालयात कै. काकासाहेब चमणकर स्मृतीप्रित्यर्थ जगदीश चमणकर पुरस्कृत किशोर सोन्सुरकर सातेरी व्यायामशाळा मार्गदर्शित आंतरवर्गीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन ऐश्वर्य चमणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आले. तर महाविदयालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.डी. बी. गोस्वामी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. माजी सभापती जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. बॅ.खर्डेकर श्री ही स्पर्धा गेली २८ वर्षे सातत्याने महाविदयालय घेत आहे. विदयार्थ्यांनी अशा स्पर्धेत सहभाग घ्यावा व भविष्यात होणाऱ्या राज्य व व देश पातळीवर आपल्या महाविदयालयाचा विदयार्थी विजेता व्हावा अशा शुभेच्छा माजी सभापती
जयप्रकाश चमणकर यांनी दिल्या. तर महाविदयालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.डी.बी. गोस्वामी यानी विदयार्थ्यांनी आपले कर्तव्य व जबाबदारी ओळखली
पाहिजेत, आपल्यासाठी शिक्षण क्षेत्रात वेगवेगळी दालने खुली आहेत. सामाजिक बांधिलकी ठेवा, व्यायामाची आवड निर्माण करा ,आपण उदयाचे भारताचे सुजाण नागरीक आहात .यामुळे आपले व आपल्या महाविदयालयाचे नाव मोठे करा, असे मनोगत व्यक्त केले.या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला चे सहयोगी संशोधन संचालक डॉ.वैभव शिंदे, बी के सी असोसिएशन उपाध्यक्ष सुरेंद्र खामकर, बी. के सी असोसिएशन सचिव संजय पुनाळेकर, महाविदयालयाचे पर्यवेक्षक प्रा. डी. जे. शितोळे, किशोर सोन्सुरकर, एस. एस. पाटील, जिमखाना चेअरमन डॉ.कमलेश कांबळे, ज्यु विभाग जिमखाना चेअरमन प्रा.विरेंद्र देसाई, सांस्कृतिक महोत्सव चेअरमन प्रा.पी.एम. देसाई, क्रिडा शिक्षक प्रा.वासुदेव गावडे, अबोली सोन्सुरकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या स्पर्धेसाठी पंच म्हणुन सुधीर हळदणकर, सौरभ वारंग, अमोल तांडेल, हेमंत नाईक यांनी काम पाहिले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रिडा संचालक प्रा. जे. वाय नाईक यांनी व प्रा. हेमंत गावडे यानी मानले. विजेता विदयार्थ्यांचे मान्यवराच्या हस्ते पारितोषिक देउन गौरव करण्यात आला
बॅ. खर्डेकर श्री विजेता स्पर्धक खालीलप्रमाणे –
सिनियर विभाग
१) बॅ.खर्डेकर श्री- मिलरॉय मिंगेल फर्नाडीस- एफ वाय बी.ए.
२) व्दितीय क्रमांक- हितेश विश्राम परब -एस वाय बी. कॉम.
३) तृतीय क्रमांक- जनार्दन अरुण गिरप- एस वाय बी. कॉम.
४) बेस्ट पोझर -ओम राजाराम पवार – एफ वाय बी.ए.
ज्युनिअर विभाग :
१) बॅ.खर्डेकर श्री- सोहम पेडणेकर- अकरावी,
२) व्दितीय क्रमांक- प्रणव विजय दाभोलकर- बारावी,
३) तृतीय क्रमांक- निखिल मोर्जे – अकरावी,
४) बेस्ट पोझर- प्रणव विजय दाभोलकर- बारावी.

You cannot copy content of this page