जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक महायुतीतच होणार…

खासदार नारायण राणे यांनी केले स्पष्ट:जिल्हा परिषदेच्या 31 जागा भाजप तर शिवसेना 19 जागा लढणार..

कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायण राणे यांनी आज कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या व घातलेल्या निवडणुकांच्या जागा वाटपंबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यामध्ये जागावाटप करण्यात आलेला फॉर्मुला पुढीलप्रमाणे –

भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद निवडणूकीत ३१ जागा तर पंचायत समिती निवडणूकीत ६३ जागा लढवणार आहे. तर शिंदे शिवसेना जिल्हा परिषद च्या १९ जागा व पंचायत समितीच्या ३७ जागा लढवणार आहे.

विधानसभा निहाय जागा –

सावंतवाडी मतदार संघ :

भाजप – जिल्हा परिषद ११ व पंचायत समिती १७ जागा

शिंदे शिवसेना – जिल्हा परिषद ६ व पंचायत समिती १७ जागा

कुडाळ -मालवण मतदारसंघ :

भाजप – जिल्हा परिषद ४ व पंचायत समिती १५ जागा

शिंदे शिवसेना – जिल्हा परिषद ११ व पंचायत समिती १५ जागा

कणकवली विधानसभा मतदारसंघ :

भाजप – जिल्हा परिषद १६ व पंचायत समिती ३१ जागा

शिंदे शिवसेना – जिल्हा परिषद २ व पंचायत समिती ५ जागा

You cannot copy content of this page