आरोंदा येथे माघी गणेश जयंती निमित्त २२ व २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन..

⚡सावंतवाडी ता.१८-: आरोंदा येथे श्री सिद्धिविनायक राष्ट्रोळी मंदिरात गणेश जयंती निमित्त २२ व २३ जानेवारी रोजी विविध कार्यक्रम आयोजित केले असून,
गुरुवार दिनांक २२ जानेवारी रोजी सकाळी ८:३० वाजता गणेश मूर्तीचे आगमन ,सकाळी ९:०० ते १० :०० वाजता श्रींची पूजा ,अभिषेक ,दुपारी १२ :०० वाजता महाआरती व तीर्थप्रसाद, दुपारी १:०० ते ३:०० वा.महाप्रसाद, सायंकाळी ३:०० ते ३:३० वा.महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, सायंकाळी ३:३० ते ४:३० वा .फुगडी – महिला ग्रुप तुळस, सायंकाळी ५:०० ते ६:०० भजनाचा कार्यक्रम तसेच रात्रौ ७:०० वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ , म्हापण यांचा दशावतारी नाट्यप्रयोग .

शुक्रवार दिनांक २३ जानेवारी रोजी सकाळी ९:०० ते १०:०० वा.श्रींची पूजा, अभिषेक, दुपारी १२:०० वाजता श्रींची आरती व तीर्थप्रसाद दुपारी ३:३० वाजता श्रीं च्या मूर्तीचे विसर्जन.
तरी सदरील कार्यक्रमाला सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. सिद्धिविनायक कला क्रीडा मंडळ व जोशीवाडी ग्रामस्थ, आरोंदा यांनी केले आहे

You cannot copy content of this page