नट वाचनालयातील हस्ताक्षर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.१८-: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून येथील अंकुश माजगावकर व परिवार पुरस्कृत शालेय मुलांसाठी येथील नट वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या हस्ताक्षर स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे उपाध्यक्ष नीलेश मोरजकर होते. यावेळी सचिव राकेश केसरकर, संचालक प्रकाश पाणदरे, जगन्नाथ सातोसकर, शंकर नार्वेकर, जि. प. पीएमश्री केंद्रशाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर, अजित नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यावेळी श्री पाणदरे यांनी विद्यार्थ्यांना हस्ताक्षराचे महत्त्व विशद करत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
ही हस्ताक्षर स्पर्धा इयत्ता ४ थी ते ५ वी, व इयत्ता ६ वी ते ७ वी अशा दोन गटांत घेण्यात आली. स्पर्धेत एकूण ५३ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमास शिक्षक, पालक तसेच वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
फोटो:-
बांदा नट वाचनालयात आयोजित हस्ताक्षर स्पर्धेचे दीपप्रज्वलन करून उदघाटन करताना मान्यवर.

You cannot copy content of this page