दोडामार्ग–माटणे मतदारसंघात रविकिरण गवस आघाडीवर…

⚡दोडामार्ग ता.१७-: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे विधानसभा उपाध्यक्ष रविकिरण गवस सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. अल्प कालावधीत त्यांनी ५० हून अधिक आंदोलने करून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे.

खोक्रल गावचे मूळ रहिवासी व पुण्यातील यशस्वी उद्योजक असलेले गवस सध्या दोडामार्ग–माटणे मतदारसंघात २४x७ सक्रिय आहेत. संघटन मजबूत करत त्यांनी राष्ट्रवादीला नवसंजीवनी दिली आहे.
नुकत्याच चर्चेनंतर त्यांना माटणे मतदारसंघातून उमेदवारीसाठी हिरवा कंदील मिळाल्याची जोरदार चर्चा असून, महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीचा दावा बळकट झाला आहे.

You cannot copy content of this page