भाजपची महायुती असली तरी स्वतंत्र उमेदवाराची चाचपणी…

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची सज्जता:रणजित देसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती.. कुडाळ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचं ठरलं असलं तरी भाजप कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज असल्याचं दिसतंय. महायुती असली तरी भाजपने प्रत्येक मतदारसंघात भाजपच्या स्वतंत्र उमेदवाराची चाचपणी केली असल्याच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी म्हटलं आहे. कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत…

Read More

मोदी सरकारचे अकरा वर्षातील काम लोकांपर्यंत पोहोचवणार…

रणजित देसाई यांनी घेतला मोदी सरकारच्या कारकिर्दीचा आढावा:कुडाळ मंडलची बैठक संपन्न.. कुडाळ : २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आलं. त्याला यावर्षी ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. या अकरा वर्षात मोदी सरकारने देशातल्या जनतेसाठी ज्या ज्या योजना राबविल्या, जी कामे केली, परराष्ट्र धोरण, संरक्षण मजबूत केले. या सर्व गोष्टी लोकांपर्यंत पोहोचविण्याचा कार्यक्रम सध्या भारतीय जनता पक्षाकडून…

Read More

आराम बसची हुल ; ट्रक पलटी…

ट्रकचे मोठे नुकसान ; जीवितहानी नाही.. कणकवली : समोरून येणाऱ्या आरामबसने हुल दिल्याने कोल्हापूरच्या दिशेने जाणारा ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूने पलटी झाला. कणकवली – फोंडाघाट राज्य मार्गावरील करूळ येथील कारखाना थांब्यानजीक बुधवारी सकाळी ६ वा. सुमारास झालेल्या या अपघातात सुदैवाने कुणाला दुखापत झाली नसली तरी ट्रकचे बरेच नुकसान झाले. ट्रक सिमेंटशी संबंधित एका द्रव्याची वाहतूक…

Read More

सिंधु पवार यांचा बांदा बीट मधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वतीने सत्कार…!

⚡बांदा ता.१८-: सावंतवाडी तालुक्याच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका तथा मुख्य सेविका सिंधु पवार यांचा सेवानिवृत्ती निमित्त बांदा बीट मधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.श्रीमती पवार या मुळच्या धुळे जिल्ह्यातील असून एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागात देवगड तालुक्यात त्यांची सर्वप्रथम नेमणूक झाली. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील वैभववाडी व सावंतवाडी तालुक्यामध्ये काम केले. सावंतवाडी तालुक्यातील…

Read More

राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत बांदा केंद्र शाळेचे घवघवीत यश…!

⚡बांदा ता.१८-: महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत पीएम श्री बांदा नं.१केंद्र शाळेत चार विद्यार्थ्यांनी सुयश मिळवले. गणित अध्यापक मंडळाच्या वतीने दरवर्षी गणित संबोध , प्राविण्य व प्रज्ञा अशा टप्प्याने‌ परीक्षा घेण्यात येतात .अत्यंत कठीण असलेल्या गणित प्रज्ञा परीक्षेत बांदा केंद्र शाळेतील दुर्वा दत्ताराम नाटेकर,स्वरा दिपक बांदेकर, तन्वी…

Read More

तुटलेल्या वीज खांबाचे राहिलेले मूळ हटवून रस्ता केला मोकळा…

नागरिकांनी मानले दीपक पाटकर यांचे आभार.. मालवण : (प्रतिनिधी) मालवण धुरीवाडा मार्गावर दोन वर्षांपूर्वी वीज खांब तुटून त्याचे मूळ असलेला लोखंडी भाग अर्धवट स्थितीत रस्त्यावर राहिल्याने अपघाताना निमंत्रण ठरत होता. गेले काही दिवस पडणाऱ्या पावसामुळे तर वीज खांबचा लोखंडी भाग अधिकच वर आल्याने अपघातांचा धोका वाढला. याबाबत स्थानिक नागरिकांनी शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर यांचे लक्ष…

Read More

कोल्हापूरच्या डॉ.व्ही. टी. पाटील फाउंडेशनचा संदीप सावंत यांना परिवर्तन दूत पुरस्कार…

⚡कणकवली ता.१८-: कोल्हापूर येथील डॉ.व्ही. टी. पाटील फाउंडेशन यांच्यामार्फत दिला जाणारा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल मीना सामंत परिवर्तन दूत पुरस्कार स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कणकवली येथे सामाजिक काम करणारे संदीप श्रीधर सावंत यांना प्रदान करण्यात आला. कोल्हापूर येथील गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवल क्लब, कोल्हापूर या ठिकाणी संदीप सावंत यांनारोख रक्कम 5000/- मानपत्र देऊन सन्मानित करण्यात…

Read More

बदललेल्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेवर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन…

सावंतवाडी, कणकवली व तळेरे येथे मोफत सत्रे ⚡सावंतवाडी ता.१८-: चालू शैक्षणिक वर्षी पदवी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप बदललेले असून त्याची माहिती विद्यार्थी व पालकांना व्हावी यासाठी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्यावतीने सावंतवाडी, कणकवली व तळेरे या ठिकाणी मोफत मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बदललेल्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसोबतच विविध शाखांची ओळख, शिष्यवृत्ती योजना तसेच…

Read More

नेमबाज स्पर्धेत आजगांवकर पितापुत्रांचे यश…!

⚡वेंगुर्ला ता.१८-: महाराष्ट्र रायफल असोसिएशन तर्फे ५ ते ९ जून या कालवधीत २८वी कॅप्टन एस.जे.इझेकियल स्मृती महाराष्ट्र राज्य नेमबाज अजिक्यपद स्पर्धा घेण्यात आली. यात वेंगुर्ला येथील दत्तप्रसाद निळकंठ आजगांवकर आणि कु. गौरव दत्तप्रसाद आजगांवकर या पितापुत्रांनी उज्ज्वल यश संपादन केले. या दोघांची प्रि नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या स्पर्धेत मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, कोल्हापूर, सातारा,…

Read More

भारती महाराज यांच्या हस्ते गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेच्या कला दालनाचे मोठ्या थाटात उदघाटन…!

विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर.. ⚡सावंतवाडी ता.१८-: सिंधुदुर्गातील संगीत क्षेत्रातील अग्रगण्य संस्था “गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेच्या” कला दालनाचे गुरुवार (१२ जून) रोजी तळवणे येथील भारती महाराज मठाचे मठाधीश श्री राजेंद्र स्वामी भारती महाराज यांच्या हस्ते न्हावेली येथे मोठ्या थाटात उदघाटन पार पडले. या मंगल प्रसंगी दिवसभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले होते.सकाळी…

Read More
You cannot copy content of this page