मालवणमध्ये फासकीत अडकलेला बिबट्या वाचला; वनविभागाची तत्पर कारवाई…
⚡मालवण ता.१८-: स्थानिक ग्रामस्थ श्री. सुभाष तळवडेकर यांनी परिमंडळ मालवण, नियतक्षेत्र धामापूर, राठीवडे (भाकरदेव) नजीकच्या मालकी जंगल भागात एक बिबट्या फासकीत अडकल्याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनअधिकारी, जलद बचाव पथक आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने सदर बिबट्याची सुरक्षित सुटका करण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या पथकाने दक्षतेने काम करत बिबट्याला फासकीतून…
