मळगाव येथे २६ रोजी तालुकास्तरीय कराओके गायन स्पर्धा…

उदय जामदार अचानक ग्रुप मित्र मंडळ व अचानक महिला मैत्री ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन..

⚡सावंतवाडी ता.१९-: मळगाव येथील खानोलकर मंगल कार्यालय येथे सोमवार २६ जानेवारी रोजी सायंकाळी ४.०० वाजता सावंतवाडी तालुकास्तरीय कराओके गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उदय जामदार अचानक ग्रुप मित्र मंडळ व अचानक महिला मैत्री ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश फी २५० रुपये असून पहिल्या २५ स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक – रोख रुपये ३३३३/- व ट्रॉफी (हनुमंत पेडणेकर पुरस्कृत), द्वितीय पारितोषिक – रोख रुपये २२२२/- व ट्रॉफी (बाळू गावडे पुरस्कृत), तृतीय पारितोषिक – रोख रुपये ११११/- व ट्रॉफी (महेश बांदिवडेकर पुरस्कृत) ठेवण्यात आली आहेत. याशिवाय सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार असून नामदेव नाटेकर, बाळा जोशी, अमर वेंगुर्लेकर, संजय बागवे व गजानन सातार्डेकर यांच्यावतीने ती पुरस्कृत असणार आहेत. या स्पर्धेसाठी इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे २३ जानेवारीपर्यंत स्नेहल जामदार-९४२१७१४२३७, हनुमंत पेडणेकर-८२७५८५२४३५, बाळू गावडे-९४२३५१३१५६ यांच्याशी संपर्क साधून नोंदवावीत, तसेच रसिकांनी या गायन स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन
उदय जामदार अचानक ग्रुप मित्र मंडळ व अचानक महिला मैत्री ग्रुप यांच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page