प्रभाग क्रमांक ६ मधील नागरी समस्यांवर न.प. प्रशासन ॲक्शन मोडवर…

नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या पुढाकाराने तातडीच्या उपाययोजना..

सावंतवाडी ता.१९-:
प्रभाग क्रमांक ६ मधील गंभीर नागरी समस्यांबाबत नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या माध्यमातून नगरपरिषदेचे अधिकारी ॲक्शन मोडवर आले असून, बांधकाम व आरोग्य विभागामार्फत तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

बांधकाम विभागाचे तुषार सरडे, विठ्ठल कशाळीकर तसेच आरोग्य विभागाचे विनोद सावंत, दीपक म्हापसेकर यांनी प्रभागातील सर्व नाल्यांवरील वाढलेली झाडी तोडून नाले साफ केले. भरवस्तीमधील पोकळे घर व दैवज्ञ गणपती मंदिराच्या मागील बाजूस रस्त्यावर साचणारे ड्रेनेज व पावसाचे पाणी योग्य प्रकारे गटारातून नाल्यांपर्यंत वाहून जाण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.

याशिवाय सार्वजनिक शौचालय व गवंडळकर घरापासून अशोक मेस्त्री यांच्या घरापर्यंत नवीन गटार बांधून बालाजी मठामागील नाल्यापर्यंत चेंबर टाकून नाला बंदिस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सार्वजनिक शौचालय, चॅपेल गल्ली ते दर्पण रेसिडेन्सीच्या मागील बाजूपर्यंत नाला बांधून बंदिस्त करण्यास बांधकाम विभागाला सांगण्यात आले आहे.

सिस्टर कॉन्व्हेन्ट, कामत नगर बाजूने दर्पण रेसिडेन्सीच्या मागील बाजूस जोडणाऱ्या मार्गावरील साफसफाई करून अर्धवट स्थितीत असलेला स्लॅब पूर्ण करण्याबाबतही तातडीने कार्यवाही करण्याच्या सक्त सूचना नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी दिल्या. यासाठी त्यांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर बोलावून परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी श्री. शेखर पोकळे, श्री. जयेश पोकळे, श्री. अमित पोकळे, श्री. सुशांत पोकळे, श्री. शैलेश गवंडळकर, ॲड. प्रथमेश प्रभू, सौ. मेस्त्री तसेच परिसरातील रहिवासी उपस्थित होते.

You cannot copy content of this page