दोडामार्ग :
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग यांच्या ‘सिंधुशौर्य’ अभियानांतर्गत शनिवारी (दि. १७ जानेवारी २०२६) सरगवे येथील देव खंडोबा मंदिर परिसरात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडली. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला.
स्पर्धेत यंगस्टार कणकवली संघाने प्रथम, तर जय मानसिश्वर वेंगुर्ला संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. उत्कृष्ट पकडपटू, उत्कृष्ट चढाईपटू व अष्टपैलू खेळाडूंना विशेष पारितोषिके देण्यात आली.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत, विभाग संयोजक अर्थव शृंगारे, दोडामार्ग शहर अध्यक्ष प्रा. अनुराग सिनारी, शहर मंत्री मयूर तर्पे, कार्यक्रम प्रमुख रावसाहेब देसाई, सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचे सहसचिव विजयकुमार साळुंखे तसेच दोडामार्ग कबड्डी असोसिएशनचे खजिनदार संदीप गवस उपस्थित होते.
युवाशक्तीचा जल्लोष : दोडामार्गात अभाविप आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा…
