देवगड तालुका जिल्हास्तरीय कराओके गायन स्पर्धा उत्साहात कुडाळच्या ऐश्वर्या चव्हाण प्रथम…

⚡देवगड ता.१८-: रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि कराओके कलाप्रेमी सिंगिंग क्लब देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कराओके गायन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या स्पर्धेत कुडाळ येथील ऐश्वर्या चव्हाण यांनी प्रथम क्रमांक तर आदित्य आचरेकर कुडाळ यांनी द्वितीय, तर वैष्णवी चव्हाण वेंगुर्ला हे तृतीय क्रमांक मिळविला उत्तेजनार्थ बक्षीसासाठी वेंगुर्ला येथील भूषण तुळसकर यांनी प्रथम तर पडेल येथील राजेश घाडी यांनी द्वितीय क्रमांक मिळविला स्पर्धेचे परीक्षण परीक्षक शाम तेंडोलकर आणि महेश तळगावकर यांनी केले.

या जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ मंगो सिटी देवगडचे अध्यक्ष गौरव पारकर आणि कराओके कला प्रेमी सिंगिंग क्लबच्या देवगडचे अध्यक्ष सौ मनस्वी घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योन्मुख गायकांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.जिल्ह्यातून या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला असून या उपक्रमात ५१ स्पर्धकांनी सहभाग घेतला

यावेळी रोटरी क्लबचे सेक्रेटरी अनुश्री पारकर, खजिनदार दयानंद पाटील, श्रीपाद पारकर, राजू भुजबळ,विजय बांदिवडेकर , अनिकेत बांदिवडेकर, रमाकांत आचरेकर तसेच कलाप्रेमी सिंगिंग क्लबचे किसन सूर्यवंशी, ज्योती तानवडे ,मनीष मोंडकर, संजय पांचाळ, आदी उपस्थित होते या स्पर्धेच्या यशाबद्दल आयोजकांनी समाधान व्यक्त केले.

     भविष्यात रोटरी क्लब मँगो सिटीच्या  सहकार्याने राज्यस्तरीय कराओके गायन स्पर्धा आयोजित करण्याचा मानस आहे. तसेच प्राथमिक टप्प्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित स्पर्धांचे नियोजन करता करण्यात येणार आहे .देवगड संपूर्ण जिल्ह्यातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे .
You cannot copy content of this page