अच्युत सावंत-भोसले यांचे वडील कुड यशवंत सावंत-भोसले यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.०५-: भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष श्री.अच्युत सावंत-भोसले यांचे वडील कुड यशवंत सावंत-भोसले (वय ९२) यांचे काल रात्री अल्पशा आजाराने मणिपाल हॉस्पिटल, गोवा येथे दुःखद निधन झाले. स्व.कुड सावंत-भोसले हे एक प्रगतीशील बागायतदार म्हणून सर्वांना परिचित होते. तसेच ते श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य म्हणूनही कार्यरत होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, तीन मुली, जावई, भाऊ, भावजय, पुतणे, पुतण्या व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने संस्था व संपूर्ण सावंत-भोसले परिवारावर मोठी शोकछाया पसरली आहे. त्यांचे अंत्यसंस्कार आज सकाळी १०.३० वाजता शिरवल, ता. दोडामार्ग येथे करण्यात येणार आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व शोकाकुल कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

You cannot copy content of this page