महेश सारंग:मागे अल्प मतांनी माझा पराभव झाला. पण, मी थांबलो नाही, काम करत राहिलो..
⚡सावंतवाडी ता.०४-: ही निवडणूक वेगळ्या दिशेने गेली आहे. भाजप म्हणून आपण लढू अन् जिंकू. त्यामुळे अदृश्य शक्तीला न जुमानता विकासाला मत द्यावे असं आवाहन महेश सरांग यांनी केल.
मागे अल्प मतांनी माझा पराभव झाला. पण, मी थांबलो नाही. आज नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली महायुती लढत आहेत. मात्र, काही अपक्ष उमेदवार इथून उभे आहेत. त्यांच्या बोलण्यास न भुलता विकासाला मत द्या असं आवाहन श्री. सारंग यांनी केल.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उमेदवार महेश सारंग, शशी सावंत, संतोष राऊळ, पंचायत समिती उमेदवार प्राजक्ता केळुसकर, संध्या हळदणकर, मंगेश तळवणेकर आदी उपस्थित होते.
