जितेंद्र गावकर यांना जाहीर केला पाठिंबा :वेत्ये गावचे सरपंच गुणाजी गावडे यांच्या यशस्वी शिष्टाई..
सावंतवाडी ता.०५-: माजगाव पंचायत समिती निवडणुकीत महत्त्वाची राजकीय घडामोड घडली असून, अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरलेले आबा सावंत यांनी अखेर निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यांनी दुसरे अपक्ष उमेदवार जितेंद्र गावकर यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.
ही घडामोड वेत्ये गावचे सरपंच गुणाजी गावडे यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे झाली आहे. त्यांच्या मध्यस्थीमुळे आबा सावंत यांनी आपला निर्णय बदलत निवडणुकीतून माघार घेतली आणि जितेंद्र गावकर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला.
या पाठिंब्यामुळे माजगाव पंचायत समिती निवडणुकीत जितेंद्र गावकर यांची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
