मतदारांना कितीही अमिष दाखवली,तरीही माझा विजय निश्चित…

रुपेश राऊळ: तर पालकमंत्र्यांना देखील निधी देण्यास भाग पाडू..

सावंतवाडी, ता. ०५-:
मतदारांना कितीही अमिष दाखवली, ऑफर्स दिल्या तरीही माझा विजय निश्चित आहे. येथील जनता विकली जाणारी नाही. ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा ठाम विश्वास उमेदवार रुपेश राऊळ यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की, माझ्यासारखा कार्यकर्ता जर या मतदारसंघातून निवडून आला, तर पालकमंत्र्यांनाही या मतदारसंघासाठी विकासनिधी देण्यास भाग पाडू, असा इशाराही रुपेश राऊळ यांनी दिला.ते प्रचार फेरीदरम्यान पत्रकारांशी बोलत होते. तसेच ते म्हणाले प्रमोद गावडे यांच्या अश्रू ची किंमत सत्ताधाऱ्यांना मोजावे लागणार त्यांची जागा होती इकडची जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही असं देखील रुपेश राऊळ यांनी भावना व्यक्त केल्या.

You cannot copy content of this page