⚡सावंतवाडी ता.०५-: महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धांस्थान असलेल्या सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व 365 खेड्यांचा अधीपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. यानिमित्ताने शेकडो भाविक देव उपरलकर चरणी नतमस्तक होत आहेत.
सावंतवाडीतील राजघराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी मोठा उत्सव म्हणून साजरा होतो. यावर्षीही त्या निमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे. सकाळी अभिषेक व पूजा उत्सवानिमित्त पूजापाठ, त्यानंतर सर्व भाविकांना दर्शन व तिर्थप्रसादाचा लाभ देण्यात आला. रात्री नामांकित भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम तर सावंतवाडी येथील महापुरुष दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहत दर्शन घेतले.
