दिनेश सावंत:लोकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली..
सावंतवाडी ता.०५-:
मला कोणताही राजकीय वारसा नसताना आज विरोधी पक्षाच्या नेत्यांना माझ्या विरोधात माजगावमध्ये येऊन सभा घ्यावी लागत आहे, यातच माझा विजय निश्चित असल्याचा दावा माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार दिनेश सावंत यांनी केला आहे.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, यापुढे माझ्यावर कोणत्याही प्रकारची टीका करण्यात आली, तर त्याला योग्य ते उत्तर विरोधकांना दिले जाईल. तसेच, सध्या लोकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.
