महायुतीचा विजय शतप्रतिशत निश्चित…

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला विश्वास :मसुरे येथील समीर प्रभूगांवकर यांचा भाजपात प्रवेश..

⚡मालवण ता.०५-:
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप शिवसेना महायुतीच्या 25 जागा बिनविरोध विजयी झाल्या आहेत. महाराष्ट्रात हा विक्रम आहे. खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वात महायुती भक्कम असून शतप्रतिशत विजय महायुतीचाच होईल. निवडणूक निकाला दिवशी आंगणेवाडी जत्रा असून भराडी देवीचे आशीर्वाद ही महायुती सोबत राहतील. महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील. असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मालवण मसुरे येथे बोलताना व्यक्त केला.

माजी राज्यमंत्री बापूसाहेब प्रभुगावकर यांचे पुतणे मसुरे येथील समीर प्रभुगावकर यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. मसूर येथील भाजप विभागीय कार्यालय येथे हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा श्वेता कोरगावकर, तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, भाजपा महायुती मसुरे जि.प. उमेदवार क्षमा संदीप हडकर, कोळंब पंचायत समिती उमेदवार योजना जयराम कांबळी, तालुका सचिव महेश मांजरेकर, उद्योग व्यापार आघाडी तालुका रोहेश गांवकर, शक्ती केंद्र प्रमुख बंडू गावडे, यासीन सय्यद, बूथ अध्यक्ष अमरेश सावंत, जगदीश चव्हाण, तात्या हिंदळेकर, आबा पालव, मंदार परब, स्वप्नील ठाकूर, प्रशांत साळुंखे, रुपेश मेस्त्री, माजी सरपंच संदीप हडकर, शिवाजी परब, पराग खोत,ओंकार महेश दुखंडे, यश नीळकंठ शिरसाट, संदेश संभाजी सांगवेकर, महेश मंगेश शिंदे, रुपेश महेश दुखंडे, विक्रांत समीर प्रभुगावकर यांसह अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रभाकर सावंत म्हणाले,
मसूरे येथील प्रभूगावकर घराण्याला राजकीय इतिहास आहे. या घराण्यातील समीर प्रभूगावकर हे भाजपात प्रवेश करत आहेत. अनेक पक्ष प्रवेश सर्वच ठिकाणी भाजपात होत असून भाजपा महायुती अधिक बळकट होत आहे. असाही विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर म्हणाले, खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात महायुती एकसंघपणे व एक दिलाने कार्यरत असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मालवण तालुक्यातील सर्व जागी महायुतीचा विजय निश्चित आहे. मसुरे जिल्हा परिषद मतदार संघात भाजप महायुतीच्या उमेदवार क्षमा हडकर व पंचायत समिती उमेदवार छोटू ठाकूर, योजना कांबळी या मोठ्या मताधिक्याने विजय होतील. असा विश्वास व्यक्त करण्यात आला. भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांनीही महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. तर मसुरे जिल्हा परिषद भाजप महायुती उमेदवार क्षमा हडकर म्हणाल्या जनतेचे आशीर्वाद आणि सहकार्य व महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या प्रयत्नातून विजय निश्चित होईल. विकासाचा कौल देत जनतेच्या आशीर्वादाने मिळालेला हा विजय असेल असा विश्वास व्यक्त केला. जगदीश चव्हाण यांनी आभार मानले.

फोटो :

मसुरे येथील समीर प्रभुगावकर यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

You cannot copy content of this page