⚡वेंगुर्ला ता१८-: वेंगुर्ला तालुका ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत ( बाळू) सुभाष परब यांनी आज रविवार 18 जानेवारी रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव पक्षाच्या कार्यासाठी वेळ देऊ शकत नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्याकडे दिलेल्या अर्जात म्हटले आहे. त्यांनी सभापतीपद तसेच गेली सहा वर्षे तालुकाप्रमुख ही जबाबदारी सांभाळताना संघटना वाढीसाठी मोठे कार्य केले होते. ऐन जि. प., पं. स. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्याने पक्षाला व कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान जिल्हा परिषद साठी ते अन्य पक्षप्रवेश करून रिंगणात उतरणार का? याकडे तमाम वेंगुर्लावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
यशवंत उर्फ बाळू परब यांच्या राजीनाम्यामुळे तमाम शिवसैनिकांना धक्का…
