मूर्तीशाळांमध्ये लगबग वाढली
वेंगुर्ला प्रतिनिधी- गणेश चतुर्थी अवघ्या ५ दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच मूर्ती शाळांमध्ये लगबग वाढली आहे. नियोजित वेळेत गणेश सुबक व आकर्षक मूर्ती गणेशभक्तांना उपलब्ध करुन देण्यासाठी मूर्तीकार रात्ररात्र जागून काम करीत आहेत. सर्वांच्या चेह-यावर हसू आणणारा, मूर्तीकारांसहीत भजनी मंडळींना व्यासपिठ मिळवून देणारा, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देणारा हा गणेश चतुर्थीचा सण १० सप्टेंबरपासून…
